कारच्या चावीनेही पेमेेंट करण्याची सुविधा फ्रान्समध्ये उपलब्ध

    26-Sep-2020
Total Views |
माॅडेल डीएस कनेक्टेड चिपची किंमत 13 लाख रुपये
 
szdxfjukygiluo;wrgetrh_1&
 
पॅरिस, 25 सप्टेंबर (वि.प्र.) : फ्रान्समधील डी.एस. ऑटाेमाेबाईल्स कंपनीने अशी टेक्नोलोजी प्रचलित केली आहे की, गाडीच्या चावीद्वारे पेमेंट करता येईल. त्यामुळे आता पेमेंट करण्यासाठी खिशात राेख र्नकम, एटीएम किंवा क्रेडिट कार्ड, वाॅलेट घेऊन दुकानात जावे लागणार नाही.यासाठी तुम्हाला माॅडेल डीएस कनेक्टेड चिप 13 लाख रुपयांत खरेदी करावी लागेल. साेबतच युजरला इंग्लंड व ऑस्ट्रेलिया मास्टर अथवा व्हिसा कार्डमध्ये नाेंदणी करणे आवश्यक आहे.कंपनीचा दावा आहे की, ही जगातील पहिली काॅन्टॅक्तलेस कारची पेमेंट सिस्टीम आहे. त्यासाठी ऑस्टे्रलियाची डी.एस.माेबाइल आणि इंग्लंडच्या बर्कले कार्ड कंपनीमध्ये करार झालेला आहे. या सिस्टीमनुसार युजरला आपल्या कारची चावी माेबाइल कार्ड रिडरसमाेर धरावी लागेल आणि रिडरसमाेर चावी फिरविताच पेमेंट हाेईल व तुमच्या अकाऊंटमधून तितकी र्नकम कमी हाेईल.कारण या चावीवर ‘की फाॅब’ लावण्यात आला आहे. सध्या किमान दाेन तीन वर्ष या टेक्नोलोजीचा फायदा अशाच लाेकांना हाेईल, ज्यांनी सप्टेंबरमध्ये लाँच झालेल्या डी-3 कने्नटेड चिप माॅडेल बुक केले असेल व याचा वापर एकट्या इंग्लंडमध्ये 5 लाख ठिकाणी करता येईल, त्यासाठी ग्राहकांना खर्चावर लक्ष ठेवण्यासाेबतच बॅलन्स टाॅकअप, कंट्राेल ब्लाॅक करता येईल. बर्कले कार्ड इनाेव्हेशन आणि पार्टनरशिप डायरे्नटर टेमी हारग्रीव्हज यांनी सांगितले की, आता लाेक फार बिझी असतात, त्यांच्याकडे फारच कमी वेळ असताे.आता प्रत्येक देशात मल्टिफन्क्षल  टेक्नोलोजीची गरज आहे, अशा स्थितीत आमची चिप आधारित पेमेंट सिस्टीम लाेकांना काेठेही काहीही खरेदी करण्याचे स्वातंत्र्य देईल आणि ते सुद्धा कारच्या चावीद्वारे. त्यामुळे एका वेळी या चावीने 2500 रुपयांपर्यंत पेमेंट करता येईल, विशेष म्हणजे ही सिस्टीम क्रेडिट आणि डेबिट कार्ड इतकीच सुरक्षित आहे.