रेस्टाॅरंट्समधील पार्सल सेवा रात्री 11 पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी

26 Sep 2020 10:51:06
प्राहा संघटनेने घेतली मनपा आयु्नतांची भेट

dsfdgfhjgh_1  H 
 
पुणे, 25 सप्टेंबर (आ.प्र.) : रेस्टाॅरंट्समधून टेकअवे आणि पार्सल देण्याची सुविधा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवावी, अशी मागणी पुणे रेस्टाॅरंट अँड हाॅटेलियर्स असाेसिएशन (PRA HA -प्राहा) या संघटनेने केली आहे. शिवाय, महापालिकेचे अधिकारी पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये संध्याकाळी 7 वाजता रेस्टाॅरंट बंद करायला भाग पाडतात आणि काही वेळा दंडही घेतात. त्याचीच माहिती देण्यासंदर्भात असाेसिएशनच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यावर, जबरदस्तीने कारवाई न करण्याबाबत आपण संबंधित विभागाला सूचना देऊ, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे.
‘प्राहा’चे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, की जवळपास सहा महिन्यांपासून रेस्टाॅरंट्स बंद आहेत. सध्या फक्त पार्सल सेवा सुरु आहे. मात्र, रेस्टाॅरंट्सच्या तुलनेत हाेणारा हा व्यवसाय अगदीच कमी आहे.सध्या प्रचंड नुकसान हाेत आहे. मात्र, जर पार्सल सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली, तर निदान आमचे नुकसान तरी थाेडेसे कमी हाेऊ शकेल.
 
Powered By Sangraha 9.0