जम्बाे काेव्हिड हाॅस्पिटलमधील डाॅक्टर, नर्स यांच्या नियुक्तीचा प्लॅन तयार : विक्रम कुमार

    26-Sep-2020
Total Views |
 
sdtfyguhio_1  H
 
पुणे, 25 सप्टेंबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क, पुणे) : सीओईपीतील जम्बाे काेव्हिड हाॅस्पिटलमधील नियाेजित डाॅक्टर आणि नर्स यांच्या नियुक्तीचा प्लॅन तयार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी सांगितले. ज्या मेटाब्राे कंपनीला येथील व्यवस्थापनाचे काम दिले आहे, त्यांनी ही लिस्ट महापालिकेला दिली आहे.जम्बाे काेव्हिड हाॅस्पिटलमध्ये सुरुवातीला डाॅक्टर, नर्स नाहीत. अन्य वैद्यकीय सहायक मनुष्यबळ नाही, अशी ओरड हाेऊन याविषयी नकारात्मकता तयार झाली हाेती. मात्र आता या जम्बाे हाॅस्पिटलला बळ देऊन त्याची पुनश्च उभारणी करण्यात आली आहे. ज्या कंपनीला हे काम देण्यात आले हाेते, त्यांना काढून टाकून मेटाब्राे कंपनीला हे काम दिले आहे.या कंपनीने व्यवस्थापनाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर 400 बेडचे नियाेजन सद्यस्थितीत झाले आहे.आणखी 400 बेडचे नियाेजन करण्यात येणार आहे.त्यासाठी तेथे डाॅक्टर, नर्स तसेच अन्य तज्ज्ञ वैद्यकीय स्टाफची आवश्यकता आहे. हा स्टाफ कधी जाॅईन हाेणार याचा सगळा डाटा संबंधित कंपनीने हाॅस्पिटलच्या पीएमआरडीए आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नेमलेल्या कार्यकारी समितीकडे साेपवल्याचे आयुक्त कुमार म्हणाले. यामध्ये डाॅक्टर, नर्सची नावे, कधी नियुक्त हाेणार याचा तपशील आणि अन्य साेयी कधी पूर्ण हाेतील याचा तपशील देण्यात आला आहे. त्याविषयी आता अभ्यास करून चर्चा हाेईल, असे विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. गणेशाेत्सवात आलेली काेराेनाची लाट आता ओसरत चालली आहे.गणेशाेत्सव झाल्यानंतर 28-29 टक्के पाॅझिटिव्हचा रेट हाेता, ताे आता 25 ते 23 टक्क्यांवर आला आहे.काही दिवसांनी ताे आणखी कमी हाेण्याची शक्यता आयुक्त कुमार यांनी व्यक्त केली.