फ्रेंच अध्यक्षांच्या ताफ्यात महिंद्राची तीनचाकी स्कूटर

    26-Sep-2020
Total Views |
 
sdtfyu,i.o/_1  
 
मुंबई, 25 सप्टेंबर (वि.प्र.) : महिंद्रा ग्रुपच्या मालकीची फ्रान्सची कंपनी प्यूजाे माेटारसायकल्सची (झर्शीसशेीं चेीेंलूलश्रशी) तीनचाकी स्कूटर मेट्राेपाेलिसचा फ्रान्सच्या अध्यक्षांच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे.या महिन्याच्या सुरुवातीलाच ही तीनचाकी स्कूटर फ्रान्समध्ये लाँच झाली. याआधी प्यूजाे ई-ल्यूडिक्स ही स्कूटरदेखील फ्रान्स अध्यक्षांच्या ताफ्याचा भाग आहे. याबाबतची माहिती देणारे ट्विट रिट्विट करत आनंद महिंद्रांनी लिहिले की, आपण नक्कीच चांगल्या दिशेने जात आहाेत प्यूजाे माेटारसायकल्स महिंद्रा राइसची कंपनी.या वर्षीच्या सुरुवातीला मे 2020 मध्ये अधिकृत लाँचनंतर, प्यूजाे मेट्राेपाेलिस स्कूटरचा चीनमधील ग्वांगडाेंग सिटी पाेलीस ताफ्यातदेखील समावेश करण्यात आला हाेता. त्याच वेळी आनंद महिंद्रांनी ट्विट करत फ्रान्स सरकारला या स्कूटरला आपल्या ताफ्यात समावेश करावा, असे म्हटले हाेते. याशिवाय लवकरच भारतातदेखील कमी किंमतीत ही स्कूटर उपलब्ध करून देण्याची इच्छा त्यांनी व्य्नत केली हाेती. मेट्राेपाेलिस स्कूटर लवकर भारतात उपलब्ध हाेईल. मात्र, अद्याप भारतात तीन-चाकी स्कूटरबाबत एवढी लाेकप्रियता दिसून येत नाही.