कलाहांडीतील गर्भवतींना प्रसूतीसाठी 35 किमी अंतर कापावे लागते...

    26-Sep-2020
Total Views |
 
भुवनेश्वर, 25 सप्टेंबर (वि.प्र.) : एकीकडे प्रगतीचा डांगाेरा पिटणाऱ्या आपल्या भारतात अजूनही गराेदर महिलांना काही काही मैल अंतर पार केल्यावर दवाखाना उपलब्ध हाेताे. अद्यापही मागास असलेल्या ओडिशातील अनेक महिलांना या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. कलाहांडी जिल्ह्यातील आदिवासी महिलांना आजही 35 किलाेमीटर अंतर पार केल्यावर प्रसूतिगृह मिळते. या आदिवासी पाड्यांवर ना अ‍ॅम्ब्युलन्स पाेचत ना तिथे संपर्काची साेय. असे असूनही घरातील इतर सदस्य संबंधित महिलेला साेबत करतात आणि दूर अंतरावर असलेल्या आराेग्य केंद्रात घेऊन जातात.