‘एनआयएन’तर्फे पाेषण आहार कार्यक्रम

26 Sep 2020 10:30:26
 
sdgfhgjhk.o/_1  
 
पुणे, 25 सप्टेंबर (आ.प्र.) : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचराेपॅथीतर्फे (एनआयएन) पाेषणमास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी तसेच किशाेरवयीन मुलींसाठी पाेषण आहार घेण्यासंदर्भात वेबिनारद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे.एनआयएनमध्ये 14 ते 30 सप्टेंबरदरम्यान हा पाेषणमास कार्यक्रम सुरू झाला आहे. या अंतर्गत एनआयएन येथील डाॅ्नटर वेबिनारद्वारे मार्गदर्शन करत आहेत. डाॅ. ज्याेती कुंभार, डाॅ. सीमा भवन, डाॅ. परेश वाडेकर, डाॅ. पराग वाडेकर, डाॅ. अजिंक्य पवार, डाॅ. प्रणव खाेले आदी डॉक्टरांमार्फत दरराेज वेबिनारच्या सहायाने पाेषण आहारासंबंधीची माहिती आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका तसेच किशाेरवयीन शालेय विद्यार्थिनींना देण्यात येत आहे. सकाळी 11 ते दुपारी साडेबारा आणि दुपारी दाेन ते तीन या वेळेमध्ये ही वेबिनार भरविण्यात येत आहेत. यंदा काेराेनाच्या पार्श्वभूमीवर वेबिनारद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. गर्भवती महिला तसेच किशाेरवयीन मुलींना जीवनसत्त्वानुसार काेणत्या प्रकारचा आहार घेणे उपयुक्त आहे, यासंबंधीची माहिती याद्वारे देण्यात येत आहे, अशी माहिती एनआयएनच्या जनसंपर्क अधिकारी डाॅ. अवंतिका नंदा यांनी दिली.
 
Powered By Sangraha 9.0