कासरगाेडमध्ये भुतांचे लग्न लावण्याची प्रथा

    26-Sep-2020
Total Views |
 
srdtfyguhio_1  
 
केरळातील कासरगाेड जिल्ह्यात मात्र काही जमातीत आजही खराेखरच भुतांची लग्ने लावली जातात.ही प्रथा इथे अनेक जमातीत पाळली जाते. ही लग्ने अगदी विधिवत म्हणजे पत्रिका जुळवण्यापासून ते लग्नातील सर्व विधी करून साजरी हाेतात.फक्त वधूवरांच्या जागी त्यांचे त्यांचे पुतळे आणले जातात. ज्या कुटुंबात लहानपणी मुले मरण पावली आहेत. अशा कुटुंबात अशी भुतांची लग्ने करण्याची प्रथा पाळली जाते. या प्रथेला प्रेता कल्याणम असे म्हटले जाते.पुतळ्यांना पारंपरिक विवाह पाेषाख घातले जातात. वरमाला घातली जाते व लग्नाची मेजवानीही केळीच्या पानांवर दिली जाते. मृत मुलांचा सन्मान करण्याची ही पद्धत आहे.यामागे असेही कारण सांगितले जाते की, अनेक कुटुंबात लहान वयात मुले मरण पावलेली असतात. परंतु कालांतराने त्या कुटुंबातील दुसऱ्या मुलांचा माेठेपणी विवाह न जमणे, माेठेपणी घरात अडचणी येणे अशा संकटांना सामाेरे जावे लागते. अशावेळी ज्याेतिषी मृत मुलांचा विवाह करा, असा सल्ला देतात. मृत मुलांचा विवाह झाल्याशिवाय त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही, असाही समज आहे.