चूक पुन्हा केल्यास जास्त दंड द्यावा लागेल

    26-Sep-2020
Total Views |
वाहन विकणाऱ्या कंपन्यासुद्धा वाहनाबराेबर विमा काढून देतात. त्या असे विमा कंपन्यांबराेबर करार करून करतात. असे आवश्यक नाही की तुम्ही त्यांच्याकडूनच विमा काढावा. तुम्ही तुमच्या पसंतीच्या काेणत्याही कंपनीकडून विमा काढू शकता...
 
४६५७८९०-_1  H x
 
वमा न काढता वाहनाला रस्त्यावर आणणे माेटर वाहन कायद्यानुसार गंभीर अपराध मानला गेला आहे.अशा वेळी जर काही दुर्घटना झाली तर, वाहन तर जप्त हाेईलच, पण आर्थिक रूपानेही तुम्हाला माेठे नुकसान सहन करावे लागेल. समाेरच्याला झालेले नुकसान खिशातून भरावे लागेल. पाेलिस-काेर्टाच्या बाबतीत अडकाल ते वेगळेच. आणखी एक गाेष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे, पहिल्या वेळेस विमा नसलेले वाहन चालविताना पकडले गेल्यास, 1,000 रुपये दंड भरून चालत हाेते. पण ‘नवीन माेटर वाहन अधिनियम 2019’ लागू झाल्यानंतर ही र्नकम दुप्पट झाली आहे. म्हणजे तुम्हाला दंड म्हणून 2,000 रुपये द्यावे लागतील. जर याच अपराधासाठी दुसऱ्या वेळेस पकडले गेलात तर दंड 4,000 रु. हाेईल.या सर्व त्रासांपासून वाचण्यासाठी आपल्या वाहनाचा विमा काढल्यानंतरच वाहन रस्त्यावर आणले पाहिजे.
 
‘अ‍ॅड-ऑन’ कव्हरेज र्नकम वाढविण्यासाठी
 
वाहन विमा काढताना तुम्हाला ही सुविधा मिळालेली असते की, तुम्ही अतिर्नित प्रीमियम भरून ‘अ‍ॅड-ऑन’ मिळवू शकता. अ‍ॅड-ऑन कव्हरेज वाढविण्याचा चांगला मार्ग आहे. नवीन वाहनांसाठी झीराे डिप्रिसियन अ‍ॅड ऑन अनिवार्य आहे. कारण हा ‘देय दाव्या’ला वाढविताे. जर वाहन जुने असेल तर अ‍ॅड-ऑन कव्हरचा फायदा नाही. याच प्रकारे जर तुम्ही अशा विभागात राहता जेथे पुराचा धाेका आहे, तर ‘इंजिन प्राेटे्नट’ अ‍ॅड-ऑन घेण्याचा सल्ला दिला जाताे. जर तुमच्या भागात पूर येत नसेल किंवा पावसाळ्यात पाणी जमा हाेत नसेल तर, अशा पद्धतीचा अ‍ॅड ऑन तुमच्या प्रीमियम राशीला वाढवेल. म्हणून माेटर इंशूरन्स पाॅलिसी कव्हरेजला निवडताना लक्षात ठेवा आणि तित्नया कव्हरसाठीच पैसे भरा, जित्नयाची तुम्हाला आवश्यकता आहे.
 
अशा प्रकारे निश्चित हाेताे वाहन विमा प्रीमियम
 
तुमच्या वाहनाचा प्रीमियम किती असेल हे काही गाेष्टींवर अवलंबून असते. जसे की, वाहनाची किंमत, वाहन काेणत्या राज्य-शहरात नाेंदलेले आहे, वाहनाचे माॅडेल, पाेटेन्शियल, रिस्क फॅ्नटर (संभाव्य जाेखीम घटक) याच्याशी संबंधित असतात. त्याव्यतिर्नित नाे क्लेम  बाेनस, तुम्ही कधी क्लेम घेतला असेल तर त्याची माहिती. व्य्नतीचे वय आणि तुमच्या ड्रायव्हिंगचा इतिहास इत्यादी.
 
हा आहे नवीन नियम
 
दुचाकी वाहनांसाठी कमीत कमी तीन वर्षांचा थर्ड पार्टी विमा आणि चार चाकी वाहनांसाठी कमीत कमी पाच वर्षांचा थर्ड पार्टी विमा काढणे अनिवार्य आहे.
माेटर सायकल, स्कूटर वगैरेंसाठी या विम्याबराेबरच विमा कंपन्यांना 1 लाख रुपयांचा व्य्नितगत दुर्घटना विमा अनिवार्यपणे द्यावा लागेल.