काेव्हिडच्या बैठकांना पिंपरीच्या महापाैरांची अनुपस्थिती

    26-Sep-2020
Total Views |
पिंपरी, 25 सप्टेंबर (आ.प्र.) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांसाेबत हाेणाऱ्या बैठकांना पिंपरी-चिंचवडच्या महापाैरांची सातत्याने सुरू असलेली अनुपस्थिती हा चर्चेचा विषय बनला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महापाैर त्यांचा प्रतिनिधीही या बैठकीला पाठवित नसल्यामुळे शहरातील काेव्हिड परिस्थितीचा आढावा केवळ आयुक्त श्रावण हर्डीकर हेच देत असल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे काेव्हिड परिस्थितीतील त्रुटींचे निराकरणच हाेत नसल्याचा आराेप हाेत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दाेन्ही महापालिकांचे आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व दाेन्ही महापालिकांच्या महापाैरांच्या उपस्थितीमध्ये दर शुक्रवारी पुण्यात आढावा बैठकीचे आयाेजन केले जाते.या बैठकीला पिंपरी-चिंचवडच्या महापाैर उषा ढाेरे वारंवार अनुपस्थित राहत असल्यामुळे लाेकप्रतिनिधी या नात्याने काेव्हिडचा आढावा उपमुख्यमंत्र्यांकडे सादरच हाेत नाही.आयुक्त श्रावण हर्डीकर हे केवळ चांगल्याच बाबी सादर करत असल्यामुळे काेव्हिडच्या परिस्थितीमधील त्रुटी दूर हाेण्यात अनेक अडथळे येत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वसामान्य नागरिक हे थेट लाेकप्रतिनिधी अथवा पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असतात. त्यांच्या नेमक्या अडचणी या लाेकप्रतिनिधींना माहिती असतात.