काेराेना संसर्गापासून वाचण्यास दागिनेही करा स्वच्छ

    26-Sep-2020
Total Views |

67676_1  H x W: 
 
बाहेरची कामे आटाेपून घरी आल्यावर तुम्ही स्वच्छतेचे सगळे उपाय करता. म्हणजे साबणाने हात स्वच्छ धुता, बाहेर जाताना घातलेले कपडे बाजूला टाकता किंवा लगेच साबणाच्या पाण्यात घालून धुता आणि स्नानही करता. एवढे केल्यामुळे आपल्याला असलेला काेराेना संसर्गाचा धाेका टळल्याची तुमची समजूत असेल, तर ती बदला. कारण तुम्हाला संसर्गाचा धाेका अजून आहे आणि तुम्हाला त्याची जाणीव नाही. हा धाेका आहे पण तुमच्या शरीरावरील दागिन्यांमुळे.महिलांच्या गळ्यात साेन्याचे मंगळसूत्र, चेन असते. काहींच्या बाेटांत अंगठ्या असतात.शिवाय कानातील दागिने, हातांत बांगड्याही असू शकतात. वैयक्तिक स्वच्छता ठेवताना या दागिन्यांच्या स्वच्छतेकडेही लक्ष देण्याची गरज आहे.दागिने सहसा धातूंचे असल्यामुळे त्यांच्यावर विषाणू राहण्याची श्नयता असते. ते व्यवस्थित स्वच्छ केले नाहीत तर तुम्हाला संसर्गाचा धाेका असताे.डाॅ. गाैरव शर्मा म्हणतात, ‘शरीर किंवा कपड्यांवर काेराेनाचा विषाणू काेठेही असू शकताे, त्याचप्रमाणे ताे दागिन्यांवरसुद्धा असू शकताे. धातूवर ताे आठ तास जिवंत राहताे.सध्याच्या काळात चेन आणि अंगठी वापरणे श्नयताे टाळा. अगदी वापरणारच असाल, तर त्यांच्या निर्जंतुकीकरणाची काळजी घ्या.’ काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी हात साबणाने वीस सेकंद धुणे आवश्यक असते आणि हाच नियम दागिन्यांसाठीसुद्धा आहे.बाेटातील अंगठी साफ करताना किमान वीस सेकंद द्या. अंगठी आतून आणि बाहेरून स्वच्छ करा. तेच चेनबाबत करा. कानांत डुल आणि नाकात चमकीसारखे काही दागिने असतील तर तेही स्वच्छ करा.‘काेव्हिड-19’च्या विषाणूचा खात्मा करण्यासाठी 70 टक्के अल्काेहाेल असलेले सॅनिटायझर वापरतात. तेच दागिने साफ करण्यासाठीही उपयाेगी पडते. दागिन्यांच्या डिझाईनमध्ये अनेक ठिकाणी असलेल्या खाचांमध्ये विषाणू राहू शकतात. त्यामुळे या खाचा काळजीपूर्वक स्वच्छ करा. सॅनिटायझर स्प्रे किंवा सॅनिटायझर वाइप्स वापरून विषाणूंना संपवा. अंगठी, चेन किंवा डुल यासारख्या दागिन्यांच्या आतील भागांत साबण आणि अन्य घाण जमते. ती काढण्यासाठी हे दागिने गरम पाण्यात टाकून साफ करावेत.पाण्यात लिक्विड साेप घालून त्या मिश्रणाने दागिने स्वच्छ करता येतात. त्यासाठी दागिने थाेडावेळ मिश्रणात बुडवून ठेवा आणि नंतर एखाद्या ब्रशने घाण काढून टाका. रबिंग अल्काेहाेलचा वापरही करता येताे. माैल्यवान रत्ने किंवा खडे असलेले दागिने अल्काेहाेलने स्वच्छ करू नका. अल्काेहाेलमुळे खड्यांची किंवा रत्नांची चमक फिकी पडते.चांदी हा शुद्ध धातू असल्यामुळे त्यावर जीवाणू-विषाणू असण्याची शक्यता कमी असते. पण सध्याच्या काळात चांदीच्या दागिन्यांची काळजीही घ्यावयास हवी. हवेतील विविध घटकांमुळे चांदी काळी पडते. ते टाळण्यासाठीही नियमित स्वच्छता करणे गरजेचे असते. सर्वसाधारण सॅनिटायझर त्यासाठी पुरेसे आहे. पण चांदीचे दागिने घालून तुम्ही सतत बाहेर जात असाल, तर त्यांची काळजीपूर्वक स्वच्छता करा. टुथपेस्ट आणि जंतुनाशके त्यासाठी वापरा. बेकिंग साेडा आणि सिरका यांच्या मिश्रणात चांदीचे दागिने थाेडावेळ बुडवून ठेवावेत आणि नंतर कापूस किंवा ब्रशने साफ करावेत. यासाठी नेलपाॅलिश रिमूव्हरसुद्धा वापरता येते.
त्यात दागिने बुडवून कापसाने साफ करता येतात. अमाेनियाचे मिश्रण किंवा बेंझाइनसुद्धा तुम्हाला वापरता येईल.