नागालँडमध्येही पिकतात सफरचंद

26 Sep 2020 10:28:01
 
dgfhjkl_1  H x
गुवाहाटी, 25 सप्टेंबर (वि.प्र.) : सफरचंद म्हटले की काश्मीर किंवा हिमाचल प्रदेश आपल्या डाेळ्यापुढे येताे. मात्र, आता ईशान्येतील नागालँड राज्यात हे मधुर फळ पिकते आहे व स्थानिक उत्पादकांना त्याचा फायदा मिळू लागला आहे. आसाम रायफल्सच्या जवानाने काही वर्षांपूर्वी भेट दिलेल्या राेपांच्या माध्यमातून येथे सफरचंदाची लागवड हाेत आहे. तेथील स्टुडंट्स युनियनच्या मदतीने ही लागवड केली जाते. काेहिमासारख्या शहरात ही सफरचंदे 1000 रुपयाला सात किलाे भावाने विकली गेली. सेंद्रिय पद्धतीने ती पिकवली जात असून, त्यांना थनमीर अ‍ॅपल्स म्हणून ओळखले जाते.
Powered By Sangraha 9.0