कसे हाेते अल्बर्ट आईनस्टाईन?

26 Sep 2020 11:08:03
 
rtyuiop[_1  H x
 
अल्बर्ट आईनस्टाईन हा जगविख्यात शास्त्रज्ञ. अल्बर्ट आईनस्टाईनला लहानपणी शिक्षणाची गाेडी नव्हती. त्यामुळे ते काहीतरी कारण काढून शाळेत जाणं टाळायचे. मात्र त्यांना मनन, चिंतन करणं फार आवडायचं. एखाद्या विषयावर विचार करत ते तासन्तास घालवायचे. त्यात त्यांचा खूप वेळ जायचा, मग त्यांना शाळेत शिक्षेला सामाेरं जावं लागायचं. एक दिवस अल्बर्टने आपल्या आईवडिलांना सांगितलं की मी शाळेत जाणार नाही. आईने त्याचे कारण विचारलं. तेव्हा ताे म्हणाला, आई तिथे शिक्षक नाही पाेलीस शिकवतात. लहानसहान कारणांवरून रागवतात, ओरडतात आणि गणित हा विषय तर मला खायला उठताे. अल्बर्ट हे सगळं सांगत असताना अल्बर्टचे काका जेकब तिथे बसलेले हाेते. ते हे सगळं ऐकत हाेते. अल्बर्टचं सांगून झाल्यावर ते म्हणाले, बेटा तू हे काय सांगत आहेस की, तुझं मन गणितात लागत नाही का? अल्बर्ट म्हणाला, खेळात माझं मन जास्त लागतं काका. जेकब म्हणाले, मग चल आपण खेळूया. जेकबने घराबाहेर अंगणात काही रेषा काढल्या आणि त्या रेषांमध्ये ते काही गाेट्या सरकवू लागले. लहान अल्बर्टची खेळातली आवड व काैशल्य पाहून जेकब म्हणाले, अल्बर्ट अरे हेच तर बीजगणित आहे. त्यात संख्यांचा शाेध घ्यावा लागताे. काका पण मला तर यात अवघड असं काहीच वाटलं नाही. गणित जर इतकं साेपं असेल तर मी शाळेत जायला तयार आहे.
Powered By Sangraha 9.0