पालकही घेतात टेंटमध्ये प्रवेश

    26-Sep-2020
Total Views |
 
rtfytuiop_1  H
 
चीनमध्ये तियानजिन विद्यापीठात हाॅस्टेलमध्ये अनाेखे दृश्य दिसते. या हाॅस्टेलच्या परिसरात काही टेंट वा तंबू उभे केले आहे. या टेंटमध्ये पालक रितसर प्रवेश घेतात. त्यांची मुले नजिकच्या काॅलेजात शिकत असतात. या मुलांना नाष्टा आणि जेवण देण्याचे काम या टेंटमध्ये राहणारे त्यांचे पालक करतात. यामागे खर्च कमी करून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उपलब्ध करणे हा हेतू असताे. पालकांसाठीच्या टेंटचा उपक्रम चीनमधील अनेक विद्यापीठांमध्ये राबवला जाताे.