जपानमधील ओकिनाेशिमा बेटाला युनेस्काेकडून हेरिटेज दर्जा

    26-Sep-2020
Total Views |
 
zdfjkufyiuoi_1  
 
टाेकियाे, 25 सप्टेंबर (वि.प्र.) : जपानमधील ओकिनाेशिमा बेटावर जाण्याची महिलांना बंदी आहे. युनेस्काेने या बेटाचा हेरिटेज यादीत समावेश केला आहे.ओकिनाेशिमा बेटावर फ्नत पुरुषच जाऊ शकतात. कारण या ओकिनाेशिमा जपानी शब्दाचा अर्थ फ्नत पुरुष असा हाेताे. पण अट अशी आहे की या बेटावर जाताना पुरुषांना सुद्धा नग्न हाेऊनच जावे लागते, तरच या तीर्थस्थळावर दर्शन करण्याची परवानगी मिळते. स्त्रिया या बंदीला भेदभाव मानत नाहीत, कारण ही अति प्राचीन परंपरा आहे व लाेकांची ती बदलण्याची इच्छा नाही. ओकिनाेशिमा एकेकाळी समुद्राच्या सुरक्षेसाठी करावयाच्या प्रार्थनेची जागा हाेती. या बेटावर 17 व्या शतकात बांधलेले ओकित्सु मंदिर आहे. या मंदिरात एक शिन्ताे पुजारी कायमस्वरूपी राहतात. ते या मंदिरातील देवीच्या मूर्तीची पूजाअर्चना करतात. फक्त मुनाकाता ताईशा येथील पुजारीच या मंदिरात धार्मिक विधी करतात.दरवर्षी 27 मे राेजी 200 लाेकांना या बेटावर जाण्याची परवानगी देण्यात येते. या लाेकांचा उद्देश 1904-05 मध्ये रशिया आणि जपानमध्ये झालेल्या युद्धात शहीद सैनिकांना मानवंदना देणे हाच असताे. या बेटावर पर्यटक माेठ्या संख्येने आल्यास हे बेट नष्ट हाेईल, अशी भीती ओकित्सु मंदिराच्या विश्वस्तांना वाटते.