साैंदर्य म्हणजे नक्की काय असतं? ते तर स्वित्झर्लंड असतं...

    26-Sep-2020
Total Views |
चाॅकलेट्स खात हिमवृष्टीची मजा लुटा


4444_1  H x W:  
 
आपला देश उष्णकटिबंधीय देश आहे. त्यामुळे येथे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू असतात. या तिन्ही ऋतूंची मजा आपल्याला लुटता येते.पण हिमवृष्टीचा आनंद आपल्याला महाराष्ट्रात घेता येत नाही. त्यासाठी आपल्याला काश्मीर किंवा हिमाचल प्रदेशात जावे लागते. ज्यांनी हिमवृष्टी अनुभवली आहे, त्यांना त्यातली माैज माहिती आहे. त्यामुळे आपल्या देशाबाहेरचा हिमवर्षाव अनुभवायची त्यांची इच्छा असते. ज्यांनी हिमवर्षाव अनुवलाय आणि ज्यांनी अनुभवला नाही, अशा दाेन्ही प्रकारच्या लाेकांनी आयुष्यात एकदा तरी पाहावा, असा देश म्हणजे स्वित्झर्लंड. पृथ्वीवरील स्वर्ग असे या देशाचे वर्णन केले जाते.स्वित्झर्लंड हा जगातील सर्वांत सुंदर देश मानला जाताे. तळी, जंगले, डाेंगररांगा, स्वच्छ हवा ही या देशाची वैशिष्ट्ये. याचबराेबर शांतता आणि स्थैर्यही इथे अनुभवायला मिळते. नैसर्गिक साैंदर्याबराेबरच लाेकशाही हे या देशाचे बलस्थान आहे. देशाच्या विकासात येथील लाेकांचा थेट सहभाग असताे.देशाची आर्थिक स्थितीही उत्तम असून करपद्धती लाेकांच्या हिताची आहे, शिवाय जीवनमान चांगले आहे. त्यामुळे येथील नागरिकांची आयुर्मर्यादाही चांगली असते. स्विस चाॅकलेट्स जगात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे येथे गेल्यावर चाॅकलेट्सची खरेदी नक्की करा.