मेंदूच्या आराेग्यासाठी झाेप गरजेची

25 Sep 2020 12:52:18
 
स्त्युइऊ.,retrjyuio_1&nbs
 
आराेग्यासाठी आहार जेवढा महत्त्वाचा असताे, तेवढीच झाेपही गरजेची असते.झाेपेचा संबंध मेंदूशी असताे. मेंदूच्या आराेग्याचा झाेपेशी संबंध असल्याचे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. संशाेधकांनी झाेपेसंबंधीच्या सांख्यिकीचे विश्लेषण करण्यासाठी झाेपेचा 60 प्रकारे अभ्यास करण्यात आला. झाेपेची वेळ, झाेपेदरम्यान डाेळ्याची हालचाल, मेंदूचा आकार आणि शरीराचा आकार यांचा अभ्यास करून संशाेधकांनी एक गणितीय माॅडेल तयार करून झाेप कशी बदलते, यावर प्रकाश टाकला आहे.झाेपेचे सामान्यतः दाेन प्रकार आहेत.दाेन्ही प्रकार मेंदूंशी जाेडलेले असतात.झाेपेदरम्यान डाेळे बंद असले, तरी बुबुळे एकीकडून दुसरीकडे फिरत असतात.एका प्रकारच्या झाेपेत गाढ झाेप लागते आणि स्वप्ने पडतात. दुसऱ्या प्रकारच्या झाेपेत स्वप्ने पडत नाहीत. पहिल्या प्रकारच्या झाेपेत मेंदू नवे मज्जातंतू तयार करताे. याचा स्मरणशक्तीशीही संबंध असताे. झाेपेदरम्यान मेंदू मज्जातंतूला झालेली हानी भरून काढत असताे.माणसाचे वय दाेन वर्षे चार महिने असते, तेव्हा दाेन्ही प्रकारच्या झाेपेचे कार्य बदलत असते. ते मज्जातंतूला झालेली हानी भरून काढण्याचा प्रयत्न करत असतात. हा बदल संशाेधकांसाठीही आश्चर्यकारक आहे, असे जर्नल सायन्स अ‍ॅडव्हान्समध्ये म्हटले आहे. प्रा. व्हॅन सॅव्हेज यांनी हा अभ्यास प्रसिद्ध केला आहे.ज्या झाेपेत स्वप्ने पडत असतात, त्या झाेपेचा कालावधी वयाबराेबर कमी हाेत जाताे. नवजात अर्भके राेज सुमारे 16 तास झाेपतात. त्यातील 50 टक्के झाेपेत त्यांना स्वप्ने पडत असतात. मात्र, मुले जेव्हा 2 वर्षे 4 महिन्यांची हाेतात तेव्हापासून ती दहा वर्षांची हाेईपर्यंत झाेपेत 25 टक्क्याने घट हाेते आणि ते 50 वर्षांपर्यंत झाेपेचा काळ 15 टक्क्याने कमी हाेताे.
 
Powered By Sangraha 9.0