काेविड काळातील निवडणुका कशा घ्यावात?

    25-Sep-2020
Total Views |
आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये विविध देशांतील तज्ज्ञांनी केली चर्चा
 
aewrtrj57k_1  H
 
मुंबई, 24 सप्टेंबर (आ.प्र.) : ‘असाेसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बाॅडीज (ए-वेब)’च्या अध्यक्षपदाचा 1 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय निवडणूक आयाेगाने ‘काेविड- 19 च्या काळात निवडणुका आयाेजित करताना जाणवलेले प्रश्न, आव्हाने आणि शिष्टाचार; देशाेदेशींच्या अनुभवांचे आदान प्रदान’ या विषयावर केंद्रीय निवडणूक आयाेगाने आंतरराष्ट्रीय वेबिनार आयाेजित केला हाेता. जगभरातील लाेकशाही देशांसाठी हा वेबिनार म्हणजे काेराेनाच्या दरम्यान निवडणूक आयाेजित करताना आलेल्या अनुभवांचे आदान- प्रदानाची संधी ठरला.गेल्या वर्षी 3 सप्टेंबरला बंगळुरूमध्ये झालेल्या ‘ए-वेब’च्या चाैथ्या सर्वसाधारण सभेत भारताने 2019- 2021 या कालावधीसाठी ‘ए-वेब’चे अध्यक्षपद स्वीकारले. या वेबिनारचे उद्घाटन करताना मुख्य निवडणूक आयुक्त आणि ‘ए वेब’चे अध्यक्ष सुनील अराेरा यांनी काेराेनामुळे उद्भवलेल्या आराेग्य आणीबाणीच्या काळात निवडणुका घ्यायच्या का आणि कशा यासंदर्भात जगभरातील निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे लक्ष वेधले.काेराेनामुळे उदभवलेली परिस्थिती आणि सामाजिक अंतर राखण्याच्या उपाययाेजनांमुळे केंद्रीय निवडणूक आयाेगाला नव्याने मार्गदर्शक सूचना अधाेरेखित करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यानुसार एका मतदान केंद्रावरील एकूण मतदारांची संख्या 1500 वरून 1 हजारपर्यंत खाली आणण्यात आली आहे. त्यामुळे एकूण मतदान केंद्रांच्या संख्येत 40 ट्न्नयांनी वाढ करावी लागली आहे. ती संख्या आता 65 हजारांवरून 1 लाखांवर गेली आहे. या बदलाचे व्यापक परिणाम, रसद पुरवठा आणि मनुष्यबळावर झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.या वेबिनारदरम्यान ‘ब्रीफ प्राेफाइल्स ऑफ द कंट्रीज, मेंबर इएमबीज अँड पार्टनर ऑर्गनायझेशन्स ऑफ ‘ए-वेब’आणि ‘काेविड-19 अँड इंटरनॅशनल इलेक्शन एक्सपिरियन्स’ या 2 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. संशाेधक, तसेच प्रत्यक्ष या कामात गुंतलेल्या सर्वांनाच ती उपयाेगी ठरतील, असा विश्वास अराेरा यांनी व्यक्त केला. ए-वेब जर्नल ऑफ इलेक्शन्स हे जागतिक दर्जाचे नियतकालिक प्रकाशित करण्याच्या दृष्टीनेही ए-वेब इंडिया सेंटरने लक्षणीय प्रगती केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. पुढील वर्षी मार्चमध्ये त्याचा पहिला अंक प्रकाशित हाेईल.