काेराेना प्रतिबंधासाठी राज्यात आक्रमक उपाययाेजना सुरू : मुख्यमंत्री ठाकरे

    25-Sep-2020
Total Views |
 
sfdfghj/k;_1  H
 
मुंबई, 24 सप्टेंबर (आ.प्र.) : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’सारख्या माेहिमेच्या माध्यमातून आम्ही काेराेनाची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून, त्याचा परिणाम म्हणून आगामी काळात महाराष्ट्रात काेराेनाचा रुग्णदर व मृत्युदर कमी झालेला दिसेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. राज्यात राेज दीड लाखांपर्यंत चाचण्या वाढवत आहाेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री बाेलत हाेते. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील काेराेनाची सध्याची स्थिती आणि उपाययाेजनांची सविस्तर माहिती पंतप्रधानांना दिली. त्यावर सरकारच्या उपाययाेजनांची स्तुती करून काही महत्त्वाच्या सूचना पंतप्रधानांनी केल्या. पंतप्रधान माेदी यांनी यावेळी ‘महाराष्ट्र के लाेग बहादुरीसे हर संकट का सामना करते है,’ अशा शब्दांत काैतुक केले. काेराेनाचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यांत विशेष समर्पित पथके नियुक्त करून संसर्ग कमी केल्यास देशाच्या काेराेना आकडेवारीवर परिणाम हाेईल, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली.आगामी काळात सणवार, उत्सव येत असून, काेराेना वाढू नये म्हणून आपल्यासमाेर आव्हान आहे. ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता असून, केंद्राने वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न साेडवणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.