उत्तम शिक्षण देणारी बायकर्सची पंढरी

25 Sep 2020 12:48:02
 
zytukyiluo_1  H
 
प्रवास करण्याने आयुष्य अनुभवसमृद्ध हाेते, असे म्हणतात.प्रवासामध्ये नवी ठिकाणी, नवी संस्कृती पाहायला मिळतेच, शिवाय नवी माणसेही भेटतात. नवे जीवन पाहून आपल्यालाही जगण्याची ऊर्जा मिळते. म्हणूनच प्रवास करणारी व्यक्ती सकारात्मक विचार करणारी असते. असाच सकारात्मक विचार करायचा असेल, तर आपणही भटकायला हवे. कुठे? तुमच्या पर्यटनाच्या यादीत डेन्मार्कचे नाव जरूर लिहा. कारण हा आहे, जगातील सर्वाधिक आनंदी देशांच्या यादीतील आनंदी देश.जगातील काेणत्या देशात राहणे अधिक चांगले, असे विचारले, तर डेन्मार्क असे म्हणता येईल. आजवर या प्रश्नाचे उत्तर शाेधण्यासाठी विविध संस्थांकडून अनेकदा सर्व्हे करण्यात आले. या सर्व्हेमधून डेन्मार्क हा देश राहण्यासाठी सर्वाेत्तम देश आहे, असे समाेर आले.याची कारणे अनेक आहेत. पहिले प्रमुख कारण म्हणजे उच्च प्रतीचे शिक्षण, दुसरे, शिक्षणासाठी काेणतेही शुल्क आकारले जात नाही आणि तिसरे सार्वजनिक आराेग्याची माेफत सुविधा. ज्यांना बायकिंगची आवड आहे, त्यांच्यासाठी डेन्मार्क हा देश नक्कीच आवडेल.काेपनहेगन तर बायकर्सची पंढरी आहे.या देशात सामाजिक समानता माेठ्या प्रमाणात आढळते; तसेच सामूहिकरीत्या कामे करण्यातही येथील लाेक अग्रेसर असतात.डेन्मार्कचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील लाेक आपल्या प्राप्तीच्या निम्मी रक्कम प्राप्तिकर म्हणून भरतात.अपारंपरिक ऊर्जाउत्पादनात हा देश आघाडीवर आहे. डेन्मार्कमधील लाेक आनंदी का आहेत, याचा शाेध घेतला असता, येथील लाेकांचा सरकारवर विश्वास आहे, असे दिसून आले.आर्थिक सुरक्षितता, स्वातंत्र्य, नागरी सहभाग आणि काम व खासगी आयुष्य यांचा समताेल या सर्व गाेष्टींमध्ये येथील नागरिक यशस्वी हाेतात.
 
Powered By Sangraha 9.0