आदरातिथ्य क्षेत्रासाठी परवान्यांची संख्या कमी करणार: आदित्य ठाकरे

24 Sep 2020 10:43:13
 
SDbdtrjyn_1  H
 
मुंबई, 23 सप्टेंबर (आ.प्र.) : राज्यातील आदरातिथ्य क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी इज ऑफ डुइंग बिझनेसअंतर्गत या क्षेत्रासाठीच्या विविध परवानग्यांची संख्या कमी करणार असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली. हाॅटेल, लाॅजेस, रिसाॅर्टस्, रेस्टाॅरंट्समधून माेठ्या प्रमाणात राेजगारनिर्मिती हाेते. त्यामुळे या क्षेत्राला चालना देण्यात येईल. नवीन हाॅटेल्ससाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या 10 पेक्षा कमी करणे हे उद्दिष्ट असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी सादरीकरण केले. आदरातिथ्य क्षेत्राला काेणकाेणत्या विभागाच्या परवानग्या लागतात, त्यातील आवश्यक नसलेल्या परवानग्यांची संख्या कशी कमी करता येईल, याबाबत त्यांनी माहिती दिली. आदरातिथ्य क्षेत्रासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या एकाच छताखाली मिळण्याच्या दृष्टीने वेबपाेर्टल तयार करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0