विषाणूविराेधी ग्राफीन मास्क लवकरच बाजारात येणार

    24-Sep-2020
Total Views |
हाँगकाँग विद्यापीठातील शास्त्रज्ञांची निर्मिती; विषाणू 100 टक्के नष्ट हाेतील
 
erd7tf6o87p9_1  
 
काेराेना विषाणूवर अद्याप काेणतेही ठाेस औषध सापडलेले नाही. संशाेधकांकडून लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे अन्य प्रकारेही विषाणूला नष्ट करण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत. त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे विषाणूविराेधातील मास्कची निर्मिती. हाँगकाँग विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी यशस्वीरीत्या ग्राफीन मास्कचे उत्पादन केले असून या मास्कमुळे विषाणू नष्ट हाेण्याचे प्रमाण 80 टक्के आहे आणि मास्क लावून सूर्यप्रकाशात दहा मिनिटे उभे राहिल्यास विषाणू 100 टक्के नष्ट हाेतात, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.या मास्कच्या सुरुवातीच्या चाचण्यांमधून काेराेना विषाणूही निष्क्रिय हाेतात, असे दिसून आल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ग्राफीन मास्कचे उत्पादन कमी खर्चात हाेत असून, मास्कसाठी कच्चा माल मिळवणे आणि मास्क नष्ट करणे दाेन्हीही साेपे आहे. सामान्यतः जे सर्जिकल मास्क वापरले जातात, ते विषाणूविराेधी नसतात. त्यामुळे अशा मास्कमुळे बाधा हाेऊ शकते; तसेच हे मास्क नष्ट करणेही अवघड असते. वापरलेले मास्क नीट नष्ट केले नाही, तर त्यामुळेही बाधा हाेऊ शकते.
ग्राफीन हे विषाणूराेधक म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच याचा वापर करून मास्क बनवावेत, असा विचार डाॅ. ये रुकाैन यांच्या मनात आला. यात कार्बन फायबर आणि मेल्ट-ब्लाेन फायबरचा वापर केलेला असताे. ते अनुक्रमे 2 टक्के आणि 9 टक्के वापरले जाते. ग्राफीन पृष्ठभागावर असलेले विषाणू 8 तासांत नष्ट हाेतात, असे दिसून आले आहे.