औरंगाबाद शहरात डेंग्यू, मलेरियाला प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे अटकाव

24 Sep 2020 10:45:08
 
Srhtsj_1  H x W
 
औरंगाबाद, 23 सप्टेंबर (आ.प्र.) : शहरात डेंग्यू व मलेरियाचा फैलाव हाेऊ नये, यासाठी शहरातील सर्व प्रभागांत घरांचे सर्वेक्षण, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शाेधून ती नष्ट करणे, औषध व धूरफवारणी करणे, पाण्यात गप्पी मासे साेडणे अशा विविध उपाययाेजना महापालिका प्रशासन सध्या राबवत असून, यामुळे डेंग्यू व मलेरियाला अटकाव करण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी या माेहिमेचे सूक्ष्म नियाेजन केले हाेते. त्या अनुषंगाने त्यांनी साथराेगांवर नियंत्रणासाठी उपाययाेजना राबवण्याचे निर्देश आराेग्य विभागाला दिले हाेते, तसेच साथराेगांचा फैलाव झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याचा इशारा दिला हाेता. पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. नीता पाडळकर आणि मलेरिया विभागप्रमुख डाॅ. अर्चना राणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण 9 प्रभागांत स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी घराघरांचे सर्वेक्षण करणे, डासांची उत्पत्ती ठिकाणे शाेधून ती नष्ट करणे, पाण्यात आबेटिंग करणे, औषध व धूरफवारणी, पाण्यात गप्पी मासे साेडणे, जनजागृतीसाठी पत्रके वाटणे, घंटागाडीमार्फत जिंगलद्वारे जनजागृती करणे अशा उपाययाेजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या डेंग्यू, मलेरियासारख्या साथराेगांना अटकाव करण्यात पालिकेला यश आले आहे.या माेहिमेत आतापर्यंत सर्व 9 प्रभागांत मिळून एकूण 208675 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, तसेच दर शनिवारी काेरडा दिवस पाळण्यासाठी जनजागृतीही करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0