ऑक्सिजन वापराचे हाेणार लेखा परीक्षण

23 Sep 2020 11:28:54

fgxnm,_1  H x W 
 
मुंबई, 22 सप्टेंबर (आ.प्र.) : सर्वसाधारणपणे पाच ते सहा टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असताना प्रत्यक्षात 15 टक्के रुग्णांसाठी त्याचा वापर करण्यात येत असल्याने खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन वापराच्या लेखा परीक्षणाचे आदेश राज्याच्या आराेग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजनच्या वापराची पडताळणी करण्याचे, भरणा केंद्रांवर देखरेख ठेवण्याचे आणि सर्व रुग्णालयांना प्रतिदिन किती ऑक्सिजनची गरज आहे, याची माहिती संकलित करण्याच्या सूचनाही आराेग्य विभागाने जिल्हा आराेग्य यंत्रणांना दिल्या आहेत. राज्यात रुग्णांच्या तुलनेत ऑक्सिजनचा वापर अधिक हाेत आहे. आवश्यकतेपेक्षा तिप्पट रुग्णांना ऑक्सिजनचा वापर केला जात आहे.याचाच अर्थ त्याचा गैरवापर केला जात असल्याचे आराेग्य विभागाने आदेशात म्हटले आहे. देशभरातील एकंदर खाटांचा विचार केल्यास काेराेना रुग्णांसाठी ऑक्सिजनची सुविधा असलेल्या सर्वाधिक खाटा महाराष्ट्रात आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात खासगी रुग्णालयेही अधिक आहेत. राज्यात सध्या काेराेना रुग्णांसाठी प्रतिदिन 600 टन ऑक्सिजन वापरला जात असून, मागणी वाढतेच आहे. खासगी आणि पालिका रुग्णालयांतील ऑक्सिजनवरील रुग्ण आणि प्रतिदिन वापरला जाणारा ऑक्सिजन यात माेठी तफावत जाणवत आहे.
Powered By Sangraha 9.0