गरीब महिलांसाठी सॅनिटरी पॅड्स दान करण्याचे आवाहन

    23-Sep-2020
Total Views |

xfnjtduy,li_1  
पुणे, 22 सप्टेंबर (आ.प्र.) : टाळेबंदीच्या काळात उत्पन्न घटल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅड्स वापरणेदेखील अशक्य झाले. हेच लक्षात घेत काही महिलांच्या पुढाकाराने जून महिन्यात ‘पॅडस््नवाड’ उपक्रमाला देशभरात सुरुवात झाली.याचाच एक भाग म्हणून येत्या 2 ऑक्टाेबरपासून सुरू हाेणाऱ्या दानाेत्सव या साप्ताहिक उपक्रमासाठी शहराच्या विविध भागांत ‘पॅड पेटी फाॅर एव्हरी बेटी’ उपक्रमांतर्गत पॅड पेटी ठेवण्यात येणार असून, यामध्ये नागरिकांनी सॅनिटरी पॅड्स दान करावेत, असे आवाहन पॅडस््नवाडच्या वतीने करण्यात आले आहे.ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हावयाचे आहे, त्या नागरिकांनी आपापल्या साेसायटी अथवा इमारतीच्या भागात 18 सप्टेंबरपासून एक पॅड पेटी लावावी व आजूबाजूच्या नागरिकांना यामध्ये सॅनिटरी पॅड्स दान करण्याचे आवाहन करावे. त्यानंतर padssquad@ gmail.com अथवा mayuridhavale2019@या मेल आयडीवर संपर्क साधावा. या उपक्रमामधून जमा झालेले सॅनिटरी पॅड्स पॅडस्क्वाडच्या वतीने एकत्रित करण्यात येतील व आजूबाजूच्या परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांपर्यंत पाेहाेचविण्यात येतील.ऑक्टाेबर महिन्याच्या 2 तारखेपासून देशभरात संपूर्ण आठवडा विविध संस्था एकत्र येत ‘दानाेत्सव’ या उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी गरजूंना मदत करीत असतात, याच उपक्रमात सहभागी हाेत पॅडस्क्वाड  ही जमा केलेली सॅनिटरी पॅड्स गरजू महिलांपर्यंत पाेहाेचविणार आहेत. पुणे शहरात 18 सप्टेंबरपासून सॅनिटरी पॅड्स जमा करायला सुरुवात झाली आहे .पॅडस््नवाडबद्दल अधिक माहिती : टाळेबंदीच्या काळात उत्पन्न घटल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांनी मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅड्स वापरणे बंद केले ही बाब काही महिल्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी आपआपल्या पद्धतीने या महिलांना सॅनिटरी पॅड्स पाेहाेचविणे सुरू केले.यामध्ये तरंजीत काैर, चित्रा सुब्रमणियम् या महिलांनी पुढाकार घेतला. काही काळातच या उपक्रमाबद्दल जागृती हाेऊन मयूरी जाेशी ढवळे, गिलियन पिंटाे, निया, माेनिका राजेजा, सूर्या बालकृष्णन्, देवाशिष मखीजा आणि शिल्पी सिंग हे नागरिकदेखील या उपक्रमाशी जाेडले गेले. आज याचा व्याप वाढला असून, देशातील 22 शहरांतील महिला या त्या शहराबराेबरच आजूबाजूच्या 30 हून अधिक भागात गरजू महिलांपर्यंत ही सॅनिटरी पॅड्स पाेहाेचवित आहेत. जून महिन्यापासून आजवर तब्बल 3 लाख सॅनिटरी पॅड्सचे वितरण या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. नुकत्याच आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीत या उपक्रमाच्या माध्यमातून सॅनिटरी पॅड्स गरजू महिलांपर्यंत पाेहाेचविण्यात आले.