निकृष्ट अन्नधान्य वितरण केल्यास कारवाई ; छगन भुजबळ यांचा इशारा

23 Sep 2020 11:01:17
 
xtjcylu.i_1  H
 
मुंबई, 22 सप्टेंबर (आ.प्र.) : मुंबई, ठाणे शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत दुकानांतून सर्वसाधारण दर्जाचे अन्नधान्य वितरित करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही काही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असल्याच्या तक्रारींची दखल अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली असून, यासंदर्भात कडक कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.त्याअनुषंगाने दक्षता पथकांमार्फत या दुकानांची अन्नधान्याच्या दर्जाबाबतची, तसेच इतर बाबींची संपूर्ण तपासणी केली असता आढळून आलेल्या त्रुटींसंदर्भात जीवनावश्यक वस्तू कायदा, 1955अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.गाेरेगावातील अधिकृत शिधावाटप दुकानाची 7 व 16 सप्टेंबरला संपूर्ण तपासणी केली असता, एकूण 54 किलाे तांदूळ आणि 61 किलाे गहू कमी आढळला. अनुक्रमे 370 किलाे तांदूळ व 525 किलाे गहू कमी वितरित केल्याचे आढळले. संबंधित दुकानदाराने 31530 रुपयांचा अपहार केल्याने या दुकानदारावर गुन्हा नाेंद करण्यात आला असून, दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले. याप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. काेणीही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य वितरित करण्याचा प्रयत्न करत असल्यास कार्यालयाच्या हेल्पलाइन क्र.022-22852814, तसेच ई-मेल आयडी dycor.ho-mumgov. in यावर संपर्क साधावा. त्यामुळे अशा शिधावाटप दुकानदारांवर कारवाई करणे शक्य हाेईल, असे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी कळवले आहे.
Powered By Sangraha 9.0