नातवंडांचा सहवास मिळाल्यावर आजी-आजाेबांचे आयुष्य वाढते

    22-Sep-2020
Total Views |
 
dfbxfcnxt_1  H
 
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर (वि.प्र.) : आजी-आजाेबांना नातवंडांचा लळा लागताे. त्याचप्रमाणे नातवांनाही आजी-आजाेबांच्या जवळ राहणे आवडते. परंतु ‘हम दाे हमारे दाे’ विचारसरणीमुळे संयु्नत कुटुंब विभाजित झाले व हे साैख्य हरवले. आता शास्त्रज्ञांनी नव्याने संशाेधन करून निष्कर्ष काढला आहे की, नातवंडांच्या सान्निध्यात राहिल्याने आजी-आजाेबांचे सरासरी आयुष्य वाढते आणि मुलांना चांगले वळण लागते. जर्मनीतील ‘एजिंगस्टडी’ ने 500 वृद्धांच्या दिनचर्येचे अध्ययन करून हा निष्कर्ष काढला आहे. यानुसार जे वृद्ध नातवडांच्या सान्निध्यात असतात, त्यांचे सरासरी आयुष्य 5 वर्षांपेक्षा जास्त वाढते.याचे कारण असे की, आजी-आजाेबा नातवंडांशी समरस हाेऊन दिवसभर सक्रिय राहतात. त्यामुळे त्यांना मानसिक ताण येत नाही व त्यामुळे त्यांचे आयुष्य वाढते.तसेच मुलांना भविष्यात समस्यांचा सामना करण्याची क्षमता निर्माण हाेते. तसेच त्यांना वैफल्याचा त्रास हाेत नाही, असे ऑ्नसफाेर्डच्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. ज्या घरात नातवंडे आणि आजाेबांचे घनिष्ठ सान्निध्य असते, ती मुले व आजी-आजाेबा नेहमी आनंदाची अनुभूती करतात. शास्त्रज्ञांनी 20 वर्षांचा डाटा गाेळा करून त्याचे अध्ययन केले व त्यांना असे आढळून आले की, आजी-आजाेबा आणि मुलांचे एकमेकांना लाभलेले सान्निध्य त्यामुळे त्यांचा मानसिक ताण-वैफल्य कमी हाेते.आजी-आजाेबांच्या सान्निध्यात मुलांना वाचनाची गाेडी लागते. ते सिद्धांतवादी हाेतात व काेणतीही समस्या चुटकीसरशी साेडवितात व त्यांचे बालपण आनंदात पसार हाेते.
याची आता ऑ्नसफाेर्ड विद्यापीठाच्या ताज्या संशाेधनामुळे पुष्टी झाली आहे. तसेच ब्रिटिश काैन्सिलच्या अध्ययनानुसार मुले आईवडिलांपेक्षा आजी-आजाेबांशी जास्त समरस हाेतात. त्यामुळे आता मुलांची व वृद्धांची साेशल मीडियावर मैत्री हाेऊ लागली आहे. 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांमध्ये फेसबुकची आवड वाढली आहे. आता साेशल मीडियांच्या माध्यमातून लहान मुले व वृद्धांमध्ये संवाद वाढत असल्याचे आढळून आले आहे.