ज्ञान मिळवण्यासाठी उपयाेगी वेबसाईट

    20-Sep-2020
Total Views |
 
xgdbcgn_1  H x
वकिपिडीया हा ऑनलाईन नि:शुल्क विश्वकाेश आहे. यात अनेक भाषांमध्ये विविध विषयांवर कराेडाे लेख उपलब्ध आहे. यात सतत भर पडत असते.विकी आणि एनसायक्लाेपिडिया या दाेन शब्दांना जाेडून विकीपीडिया शब्द तयार झाला.विकी हा शब्द हवाई बेटावर बाेलल्या जाणाऱ्या भाषेतील विकी- विकी याचं संक्षिप्त रूप आहे. ज्याचा अर्थ हाेताे तातडीने किंवा लगेच विकि हा वेबसाईट्चा एक प्रकार आहे, ज्यामध्ये माहिती साठवली जाते. विकीपिडिया हे अशा वेबसाईटचं चांगलं उदाहरण आहे.
काेणीही आपल्या नावाची विकीपिडियावर नाेंदणी करून हव्या त्या विषयावर लेखन आणि संपादन करू शकताे. स्वत:च्या इच्छेने असे लेख लिहिणाऱ्यांना विकिपेडियन्स म्हणतात.अशा लाेकांची संख्या हजाराेंच्या घरात आहे. विकिपिडीयावरील माहितीला विश्वसनीय स्राेत मानता येईलच असे नाही. तरीही सर्वाधिक लाेकप्रिय वेबसाईटच्या यादीत विकिपिडीयाचं नाव पहिल्या दहा नावांमध्ये आहे.याचं कारण कुठल्याही विषयाची माहिती या साईटवर लगेच मिळते. तसेच ती साध्या भाषेत समजावून सांगितलेली असते. विकिपिडीयालाच जाेडून विकिमीडिया काॅमन्स, विकिबुक्स, विकिक्वाेट, विकीवर्सिटी, मिडियाविकी, विकिडाटा, विकिन्यूज आणि विक्शनरी अशा बऱ्याच साईट्स आहेत.