स्मार्टफाेनचा वापर मर्यादेत करा, नाहीतर हाेताल नपुंसक

20 Sep 2020 10:19:59
 
xfgncghn_1  H x
 
संध्यानंद.काॅम
स्मार्टफाेनच्या अतिवापरामुळे शारीरिक हालचाली हळूहळू कमी हाेत जातात. अशावेळी जे लाेक ए्नझरसाइज करत नाहीत त्यांच्यासाठी समस्या आणखीच वाढतात. त्यामुळे इंफर्टिलिटीची (वंध्यत्व) समस्याही हाेऊ शकते.एका शाेधातून समजले आहे की, स्मार्टफाेनमुळे लठ्ठपणा वाढताे. जाे वंध्यत्वाच्या समस्येला वाढविताे. लठ्ठपणामुळे इनफर्टिलिटीची (वंध्यत्व) समस्या महिलांमध्येच नाही, तर पुरुषांमध्येही दिसून येत आहे. असे यासाठी हाेते कारण की, पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी हाेतात आणि महिलांमध्ये ओवुलेशनची (गर्भधारणेची) प्रक्रिया असामान्य हाेते. त्यामुळे अनेक जाेडपी आई-वडील हाेण्याच्या सुखापासून वंचित राहतात.लठ्ठपणा पुरुषांमध्ये शुक्राणूंची गतिशीलता कमी करताे, जाे वंध्यत्वाच्या समस्येच्या रूपाने समाेर येताे.लठ्ठपणाचा प्रजननक्षमतेवरही गंभीर परिणाम हाेताे. लठ्ठपणामुळे महिलांमध्ये प्रेग्नंसीची समस्या हाेते.जरी प्रेग्नंट झाल्या तरी अ‍ॅबाेर्शनची भीती राहते. त्यासाठी इंफर्टिलिटी व ओबेसिटी (लठ्ठपणा) यांच्यापासून वाचण्यासाठी स्मार्टफाेनचा वापर मर्यादित करा.
Powered By Sangraha 9.0