कागद वाचवणे म्हणजे झाड वाचवण्यासारखंच

    20-Sep-2020
Total Views |

xfghctyhj_1  H
माेबाईल, काॅम्प्युटर, टॅबलेट या सर्वांचा उपयाेग करून आपण कागद वाचवणे म्हणजेच अप्रत्यक्षपणे झाडांचा जीव वाचवणे आहे. कागदाचा कमीत कमी व आवश्यक तेवढाच वापर झाला तर आपलं पर्यावरण संतुलित राहण्यास मदतच हाेईल.
 
~कागदावर मजकूर उमटवण्यासाठी जास्त खर्च हाेत असताे, कारण त्यासाठी आपण काॅम्प्युटर, वीज, कार्टरिज, झेराॅक्स, प्रिंटर, असा कितीतरी खर्च करीत असताे.
~जाे मजकूर आपण ऑनलाईन वाचू शकताे ताे कागदावर वाचणे टाळलं तर कागद वाचवू शकताे.
~कुठल्याही गाेष्टीसाठी आपण कागदाचा नकाे तितका वापर करत असताे, एका अर्थाने आपण झाडांची हत्त्याच करत असताे.
~हळूहळू जगातून कागदच नाहीसा झाला तर, किंवा कागद वापरायचाच नाही असं ठरवलं तर..
~जर ऑिफसमध्ये अजिबात कागद वापरायचा नाही असा नियमच केला, कंपनीमध्ये कुठल्याही कपाटात कागदाला जागाच दिली नाही. सर्व कारभार डिजिटलाईज केले तर, त्यामुळे कितीतरी पटीने सर्वच कागद वाचवून, झाडांचं संरक्षण करू शकेल.
~कुठलेही करारपत्र कागदावर देणे, प्रिंटआऊट देणे हे आपण टाळू शकताे.त्यामुळे कितीतरी पटीने कागद वाचवून, झाडांचं संरक्षणच करू शकू.
~कागदाचा कमीत कमी वापर करा.गरज नसताना प्रिंटआऊट देणं टाळा.गरज नसेल तिथे कागद वापरू नका.