मलाही कलाकार म्हणून त्रास झाला : विक्रम गाेखले

    20-Sep-2020
Total Views |
 
rgbrth_1  H x W
 
पुणे, 19 सप्टेंबर (वि.प्र.) : मराठी कलाकार म्हणून मला बाॅलिवूडमध्ये घाटी म्हणून संबाेधलं जायचं, असं खळबळजनक वक्तव्य अभिनेत्री ऊर्मिला माताेंडकरने एका मुलाखतीमध्ये बाेलताना केलं हाेतं. यावर भाष्य करत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गाेखले यांनी मराठी चित्रपटसृष्टीवरच ताशेरे ओढले आहेत.मला बाॅलिवूडमध्ये कधीही नेपाेटिझमचा त्रास झाला नाही, ना कुणी वाईट वागणूक दिली, पण सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटसष्टीमध्ये खूप त्रास भाेगावा लागला, असा गाैप्यस्फाेट ज्येष्ठ अभिनेते विक्रम गाेखले यांनी केला आहे.मी हिंदीमध्ये तडजाेड म्हणून कधीही कुठलीही कामं केली नाहीत. मला काम नाही मिळालं तरी हरकत नाही, मी घरी राहीन, हे माझे आचरण आणि विचार हाेते. या आविर्भावामुळे मराठी चित्रपट क्षेत्राने मला वाळीत टाकले हाेते. पंधरा वर्षे मी मराठी चित्रपटसृष्टीपासून दूर हाेताे, असं विक्रम गाेखले यांनी सांगितलं.देशात मतप्रदर्शन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मुळात कंगना राणावत हिने असा काय गुन्हा केलाय? सुशांत केसमागे ती फक्त ठामपणे उभी राहिली. तिलाही नेपाेटिझमचा सामना करावा लागला, एवढंच ती सांगत हाेती, असं विक्रम गाेखले यांनी म्हटलंय.