नैसर्गिक पाऊस व कृत्रिम पाऊस म्हणजे काय?

    20-Sep-2020
Total Views |

xfhncgj_1  H x  
 
पृथ्वीवरील पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ हाेते. ही वाफ हलकी असल्याने वातावरणात उंच जाते. त्याचे ढगांमध्ये रुपांतर हाेते. या ढगांना थंड हवा लागली, की वाेचे रूपांतर पावसात हाेते.भूगाेलात शिकलेली ही पावसाची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया नैसर्गिक आहे.
कृत्रिम पावसात सर्व भर हा क्लाऊड सीडिंगवर असताे. जमिनीपासून सुमारे 2 ते 18 हजार ूट उंचीपर्यंत पाऊस पडण्याची क्षमता असलेले ढग असतात.उष्ण किंवा शीत या पद्धतीमध्ये क्लाऊड सीडिंग केले जाते.उष्ण पद्धतीमध्ये विमान किंवा रॅकेटच्या साहाय्याने ढगांवर साेडियम क्लाेराईडचा फवारा साेडला जाताे. शीत पद्धतीत सिल्व्हर आयाेडाईड आणि ड्राय आईस या रसायनांचा फवारा ढगांवर केला जाताे.