पुरातत्त्व खात्याच्या पुणे विभागाला दीड काेटीचा ताेटा

    20-Sep-2020
Total Views |
राज्य सरकारने परवानगी दिली, तरच खुली हाेतील ऐतिहासिक वारसास्थळ

xfgncgjn_1  H x 
 
पुणे, 19 सप्टेंबर (आ.प्र.) : काेराेनाचा संसर्ग वाढू नये यासाठी अद्यापही ऐतिहासिक वास्तुस्थळे पर्यटकांसाठी बंद आहेत. पुण्यातही भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित वास्तुस्थळे असून, गेल्या सहा महिन्यांपासून ती बंद आहेत. त्यामुळे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या पुणे विभागाला तब्बल दीड काेटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.पुण्यातील आगाखान पॅलेस, शनिवारवाडा, पाताळेश्वर गुहा, तसेच कार्ला येथील लेण्यांची देखभाल भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित येते.परंतु काेराेनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही ऐतिहासिक वास्तुस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. लाॅकडाऊनपूर्वी ही ऐतिहासिक वास्तुस्थळे पर्यटकांसाठी खुली हाेती. त्यामुळे भारतीय पुरातत्त्व खात्याला दरमहा साधारणतः पंधरा लाख रुपयांच्या आसपास तिकीट विक्रीतून निधी उपलब्ध हाेत हाेता. परंतु गेले सहा महिने ही सर्व ऐतिहासिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे जवळपास दीड काेटी रुपयांचा आर्थिक ताेटा खात्याला झाला आहे.भारतीय पुरातत्त्व खात्याच्या पुणे विभागाचे संरक्षक सहायक गजानन मंडावरे म्हणाले की, ऐतिहासिक वास्तुस्थळांच्या माध्यमातून देशाचा इतिहास पुढच्या पिढीला माहिती हाेताे. या माध्यमातून शैक्षणिक प्रबाेधनही हाेते. त्यामुळे केंद्र सरकारच्या या स्थळांच्या माध्यमातून उत्पन्न कमाविण्याचा उद्देश नसताे.तर नाममात्र तिकीट आकारल्यामुळे नागरिकांना सुद्धा ऐतिहासिक स्थळांच्या जतन आणि संवर्धनाची जाणीव राहते.त्याचसाठी तिकीट आकारण्यात येते. परंतु गेली सहा महिने ऐतिहासिक वारसा स्थळे बंद आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मुंबई येथील कार्यालयाने राज्य सरकार आणि जिल्हाधिकारी कार्यालयास ऐतिहासिक स्थळे खुली करण्याबाबत पत्र लिहिले आहे. परंतु राज्य सरकारच्या परवागनीनंतरच ही स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात येतील.