अपुऱ्या झाेपेचा परिणाम व्यक्तीच्या भावनिक प्रतिक्रियांवर हाेतो

    20-Sep-2020
Total Views |
 
awgtdhyf_1  H x
 
टाेरांटाे, 19 सप्टेंबर (वि.प्र.) : रात्री उशिरा झाेपायची सवय तुम्हाला असेल, तर ही बातमी वाचा. रात्रीची झाेप अपुरी झालेले लाेक दुसऱ्या दिवशी एखाद्या तणावाच्या काळात जास्त भावनिक प्रतिक्रिया देत असल्याचे संशाेधकांना आढळले आहे. एखाद्या चांगल्या घटनेचा आनंदही असे लाेक पूर्णपणे घेऊ शकत नाहीत.कॅनडातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश काेलंबिया’तील नॅन्सी सिन यांनी केलेल्या संशाेधनातून हा निष्कर्ष निघाला असून, ‘हेल्थ सायकाॅलाॅजी’ या नियतकालिकात त्यावरील लेख प्रसिद्ध झाला आहे. अपुऱ्या झाेपेचा परिणाम तणाव आणि आनंदाच्या प्रसंगांमध्ये कसा हाेताे, व्यक्ती त्यावर कशी प्रतिक्रिया देते, हा संशाेधनाचा विषय हाेता. ‘काेणीतरी आलिंगन दिलेले किंवा निसर्गाच्या सहवासात वेळ घालविलेले लाेक दिवसभरात जास्त उत्साही आणि समाधानी असतात, पण ठरलेल्या वेळेपेक्षा कमी झाेप झालेले लाेक आनंदाच्या प्रसंगीसुद्धा फार समाधानी नसतात असे दिसले,’ अशी माहिती नॅन्सी सिन यांनी दिली. अमेरिकेतील दाेन हजार लाेकांचा यासाठी अभ्यास करण्यात आला. त्यांच्या झाेपेची वेळ आणि ते एखाद्या प्रसंगात देत असलेल्या प्रतिक्रियांची नाेंद या संशाेधनात करण्यात आली. या सहभागींबराेबर आठ दिवस फाेनवर बाेलून त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली. रात्री आपल्याला किती झाेप मिळाली आणि दुसऱ्या दिवशी आपण काेणत्या प्रसंगावर काय प्रतिक्रिया दिली, याबाबतचे अनुभव सहभागींनी सांगितले.नेहमीपेक्षा कमी झाेप मिळालेल्या सहभागींनी दुसऱ्या दिवशी तणावाच्या प्रसंगात आपण फार भावनिक आणि आनंदाच्या प्रसंगात मर्यादित प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे नमूद केले. नॅन्सी सिन यांनी पूर्वी याच विषयावर थाेड्या वेगळ्या अंगाने संशाेधन केले हाेते.