सव्वालाख रुपयांचा स्मार्टफाेन दाेन मिनिटांत विकला गेला...

20 Sep 2020 10:14:33
 
cghnjvhjum_1  H
 
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर (वि.प्र.) : स्मार्टफाेन कंपनी माेटाेराेलाने मागील वर्षी फाेल्डेबल स्मार्टफाेन Moto RA ZR ला लाँच केले हाेते.
आता कंपनीने या स्मार्टफाेनचे अपग्रेडेट व्हर्जन आणले. Moto RA ZR ची किंमत 12,499 युआन (जवळपास 1 लाख 36 हजार रुपये) आहे. मात्र एवढी किंमत असतानाही हा स्मार्टफाेन ऑनलाइन प्लॅटफाॅर्म्सवरून अवघ्या 2 मिनिटांत ऑउट ऑफ स्टाॅक झाला.याचा पुढील सेल 21 सप्टेंबरला आहे.माझा पेपर वेबसाइटवर ही बातमी देण्यात आली आहे.फाेल्डिंग स्क्रीनसाठी कंपनीने या डिव्हाइसमध्ये खास हिंज मॅकेनिझ्म दिले आहे.याची स्क्रीन सहज फाेल्ड हाेते. फाेन ओपन केल्यानंतरही स्क्रीन अगदी फ्लॅट हाेते व याचा सहज वापर करता येताे.रिसर्चचे म्हणणे आहे की Moto RA ZR 5जीला 2 लाख वेळा फाेल्ड-अनफाेल्ड करणे शक्य आहे. याचा अर्थ युजर्स कमीत कमी 5 वर्षे याचा वापर करू शकतात.
Powered By Sangraha 9.0