बिबवेवाडीचे राज्य विमा हाॅस्पिटल अधिग्रहित : डाॅ. राजेश देशमुख

    20-Sep-2020
Total Views |
काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केलेली कार्यवाही; रुग्णालय जिल्हा परिषदेकडे वर्ग

ehttyfjy_1  H x 
 
पुणे, 19 सप्टेंबर (आ.प्र.) : बिबवेवाडी येथील कर्मचारी राज्य विमा काॅर्पाेरेशनचे रुग्णालय ( एम्प्लाॅइज स्टेट इन्शुरन्स काॅर्पाेरेशन) काेराेना केअर सेंटर स्थापन केले आहे. वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचे काेराेना कालावधीपुरते अधिग्रहण करून जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.या रुग्णालयावर जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सभाजी लांगाेरे याची तातडीने प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचे समर्पित काेविड आराेग्य केंद्रामध्ये रूपांतर करण्याकरिता कर्मचारी राज्य बीमा निगम रुग्णालय काेविड केअर सेंटर रुग्णालय सर्व मनुष्यबळ व सुविधांसह काेविड-19 चे कालावधीपुरते मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे अधिग्रहित करून वर्ग करण्यात येत आहे.याबाबतच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. सदर रुग्णालय हे श्रम एवं राेजगार मंत्रालय, भारत सरकार संलग्न केंद्रीय महामंडळाच्या नियंत्रणाखाली असलेला बाह्य रुग्ण विभाग तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद पुणे यांच्या नियंत्रणाखाली देण्यात येत आहे. रुग्णालयामध्ये जिल्हा परिषदेमार्फत काेविड केअर सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. या रुग्णालयातील उपलब्ध 50 बेडस् पैकी 36 बेडस् करिता ऑक्सिजन पाइपलाइन उपलब्ध आहे. उर्वरित बेडस्करिता ऑक्सिजन सुविधा निर्माण करण्याकरिता ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा उपलब्ध करून घेण्यात यावा. या ठिकाणी समर्पित काेविड आराेग्य केंद्र सुरू करण्याकरिता ऑक्सिजन सिलिंडर्स, व्यतिरिक्त एक्स-रे मशीन, इसीजी मशीन, अ‍ॅम्ब्युलन्स, टे्निनशियन, आवश्यकतेप्रमाणे डाॅक्टर (एमडी आणि एमबीबीएस) इत्यादी सुविधा साथराेग संपल्यानंतर माघारी घेण्याच्या अधीन राहून उपलब्ध करून देण्यात याव्यात. अनुभवी वैद्यकीय अधीक्षक/वैद्यकीय अधिकारी यांच्या नेमणुका करून कामकाज सुरळीत करावे.आदेशाचे पालन न करणाऱ्या काेणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ राेग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फाैजदारी कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डाॅ.देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे.