या अजब गाेष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

20 Sep 2020 10:32:58

fdfgfjhj_1  H x
 
~झाडावर उगवणारी यलाे ब्रेन नावाची पिवळ्या रंगाची बुरशी मानवी मेंदूसारखी दिसते. या बुरशीला गाेल्डन जेली फंगस असे म्हटले जाते. ही बुरशी पर्णपाती झाडावर उगवते. साधारण साडेसात सेंटीमीटर म्हणजे तीन इंचापर्यंत वाढणारी ही बुरशी खाता येऊ शकते.
 
~आपल्या शरीराच्या एकूण वजनापैकी चार पाैंड इतके वजन आपल्या पाेटामध्ये असणाऱ्या जीवाणूंचे असते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. आपल्या शरीरापैकी जीवाणूंची संख्या शरीरातील पेशींपेक्षाही जास्त असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. आपल्या शरीरात एकूण दहा हजार जातीचे जीवाणू असल्याचे म्हटले जाते. पण यातील सर्वच जीवाणू हानिकारक नसून आपल्या शरीरातील एन्झाइम्सच्या मदतीने हे जीवाणू इतर हानिकारक जीवाणुंचा नाश करण्यास मदत करतात.
 
~जिराफ हा प्राणी सर्व प्राण्यांमध्ये उंच तर आहेच, शिवाय त्याची जीभ ही खूप लांब असते. जिराफाला त्याच्या जिभेने त्याचे कान स्वच्छ करता येऊ शकतात. झाडाच्या सर्वांत वरच्या फांद्यांपर्यंत पाेचण्यास ही लांबसडक जीभ कामी येते.
 
~18 व्या शतकामध्ये तेरार नावाच्या फ्रेंच माणसाने तब्बल पंधरा माणसांना पुरेल इतकं अन्न स्वत:च खाऊन टाकले. त्यानंतरही त्याची भूक शमली नाही म्हणून त्याने, मांजरी, पाली तर खाल्लेच शिवाय एक अख्खा ईल मासाही खाऊन टाकला. तेरारला अशी खा खा का हाेते? याचे निदान डॉक्टरही करू शकले नाहीत. लहान असल्यापासून तेरारची भूक विलक्षण हाेती. लहान असतानाच एका संपूर्ण बकरीचे मटन ताे एकटाच खात असे. इतके खाऊनही भूक न भागल्याने शेजारच्या घरातील अन्न ताे चाेरून खात असे.या भुकेपायी तेरारने दगड, बाटल्यांची बुचे, खाण्यासही सुरुवात केली. काही काळाने तेरार फ्रेंच सैन्यात रुजू झाला, पण तिथेही त्याला मिळत असलेल्या रेशनने त्याचे पाेट भरत नसे. त्यामुळे इतर सैनिकांचे उरले सुरले रेशन ताे खाऊन टाकत असे. आश्चर्याची गाेष्ट म्हणजे इतके खाऊनही तेरारचे वजन कधीच वाढत नसे. ताे अगदी सडपातळ बांध्याचा माणूस हाेता.
 
Powered By Sangraha 9.0