मशरूमपासून तयार करणार कपडे, बूट, पर्स

    20-Sep-2020
Total Views |
 
zcghmjvhm_1  H
 
व्हिएन्ना, 19 सप्टेंबर (वि.प्र.) : साधारणपणे लाेक कातड्यापासून तयार केलेले बूट, पाेशाख, फॅशनेबल व इतर वस्तू वापरतात. पण, याच वस्तू मशरूमपासून देखील तयार करता येतात. हे फारच कमी लाेकांना माहीत आहे.मशरूम दाबून व त्यावर रासायनिक प्रक्रिया करून या मशरूमच्या लगद्यापासून कातड्याइतक्याच मजबूत व कडक वस्तू किंवा पदार्थ तयार करता येतात, असा दावा ऑस्ट्रेलियाची राजधानी व्हिएन्ना येथील व्हिएन्ना विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि प्राेेसर अलेक्झांडर बिरमार्क यांनी केला आहे. विशेष म्हणजे मशरूपासून तयार केलेल्या वस्तू सडनशील असतात. प्राे. बिरमार्क म्हणाले की, मशरूमपासून कातड्यासारखा कडक पदार्थ तयार करणे साेपे आहे.यासाठी उपकरणांची फारच कमी गरज भासते. मशरूमपासून तयार केलेली ही उत्पादने जनावरांच्या कातड्यापासून तयार केल्यासारखीच भासतात. या वस्तू तयार करण्यासाठी प्रकाशाची गरज भासत नाही. पशू आधारित उद्याेगांसाेबतच कातड्यापासून तयार केलेल्या वस्तूंचा पर्यावरणावर वाईट परिणाम हाेताे. शिवाय यासाठी भरपूर जमीन आणि संसाधनांची गरज असते. शिवाय यामुळे कार्बन डायाेक्साइडसारखा ग्रीन हाऊस गॅस माेठ्या प्रमाणावर तयार हाेताे.मशरूममुळे असे हाेत नाही.