चुकार कर्मचाऱ्यांविषयी तक्रार करताना सावधान!

    20-Sep-2020
Total Views |
 
xfgncghn_1  H x
 
प्रत्येक ऑफिसमध्ये गाॅसिपिंग करणारे किंवा काही कुचकट सहकारी असतातच.त्यांचं प्रमुख काम म्हणजे इतर काेण काय करतंय, याची सतत चाचपणी करणं आणि जाे समाेर नाही, त्याच्याविषयी कुचाळक्या करणं. प्रत्येक ठिकाणी अशा व्यक्ती कमीजास्त प्रमाणात असतात. एखादं काम अंगावर न घेता सहज बाजुला ढकलणं आणि मग पगारवाढीच्या वेळी मात्र कामाचा खूप बाेजा असल्याचे दाखवत मिळालेली पगारवाढ किती कमी आहे, याचं रडगाणं पुढच्या वर्षापर्यंत गात बसणे हा त्यांचा आवडता उद्याेग असताे.कधी काळी केलेल्या कामाचे दाखले देत आजही त्यावर मिरवण्याचा हा स्वभाव अनेकांना आवडत नाही. पण कुणी काही बाेलूही शकत नाही. कारण, असे सहकारी नेमके बाॅसचे लाडके असतात किंवा इतरांना तरी तसे वाटत असते. कारण, वेळी-अवेळी बाॅसच्या केबिनमध्ये हे बसलेले दिसत असतात. त्यामुळे बाॅसचं आणि त्याचं जमतं, असा एक समज पसरायला मदतच झालेली असते. खरंतर अशा गैरसमजांमुळे अशा सहकाऱ्यांचे अजून फावते.मीटिंगमध्ये बाॅस कामातल्या चुका दाखवून द्यायला लागले, की सगळा दाेष इतरांचा असल्यासारखा चेहरा करणे त्यांना बराेबर जमते. कुणी नाव घेऊन थेट उल्लेख केलाच, तर चेहरा पाडून इतरांची साथ कशी मिळत नाही अशी कारणंही बराेबर सुचतात.कधीकाळी त्यांनी खरंच काम केलेलं असतंही; पण त्याच्या जाेरावर आज इतरांवर रुबाब करणे त्याच्या कनिष्ठांना आवडत नाही, हे मात्र त्याला कळत नाही. कामं इतरांवर ढकलण्याच्या सवयीनुसार त्याने एकदा स्वत: रजेवर जात दुसऱ्याची रजा बिनधास्त कॅन्सल केली. दुसऱ्या दिवशी ताे दुसरा सहकारी वैतागून बाॅसच्या केबिनमध्ये तक्रार करण्यासाठी गेला, तेव्हा खुद्द हाच बाॅसच्या केबिनमध्ये चहा घेत बसलेला दिसताे.काय तक्रार करणार! त्यामुळे आपल्यालाही ऑफिसमधील एखाद्या सहकाऱ्याचा त्रास हाेत असेल किंवा त्याच्या वागणुकीमुळे आपल्याबद्दल गैरसमज निर्माण हाेत असतील तर बिनधास्त त्याच्या विरूद्ध आवाज उठवा.पण ते करताना जरा सांभाळून करा एवढंच!!!