वर्तमानपत्रे हेच बातमी मिळवण्याचे सर्वाधिक विश्वासार्ह माध्यम

    20-Sep-2020
Total Views |
फेक न्यूजची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे
 
erhftj_1  H x W
 
ऑरमॅक्स मीडियाचे संस्थापक आणि सीईओ शैलेश कपूर या सर्वेक्षणाबद्दल म्हणाले की, फेक न्यूजची चिंता जागतिक स्तरावर आहेच; तसाच ताे भारतातही चर्चेचा विषय ठरला आहे. शिवाय, फेक न्यूजची ही समस्या दर महिन्यागणिक वाढतच चालल्याचे दिसत आहे. सर्वाधिक विश्वासार्ह माध्यम म्हणून वर्तमानपत्रेच आपले स्थान कायम ठेवतील याबाबत मला शंका वाटत नाही. फेक न्यूजबाबत लाेकांचे म्हणणे समजून घेण्यासाठी दर सहा महिन्यांनी अशा प्रकारचा सर्व्हे करण्याचा विचार आहे.अमेरिका किंवा इंग्लंडमध्ये फेक न्यूजचा मुद्दा जेवढा माेठा आहे, तेवढा ताे भारतात सध्या तरी नाही.या फेक न्यूज प्राेपाेगंडाचा परिणाम निवडणुकीच्या निकालांवरही हाेताे.मात्र, असे असले तरीही भारतावर त्या धाेक्याचे सावट आहे, हेही स्पष्ट आहे. त्यामुळेच हा विषय जर उद्याेगांनी नीट हाताळला नाही, तर येत्या काही वर्षात ताे खूपच गंभीर मुद्दा बनू शकताे.
 
मुंबई / पुणे, 17 सप्टेंबर (आ.प्र.) : बातमी मिळवण्यासाठीचे सर्वाधिक विश्वासार्ह माध्यम म्हणजे वर्तमानपत्रेच आहेत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मीडिया कन्सल्टिंग फर्म ऑरमॅक्स मीडियाने यासंदर्भात नुकतेच एक सर्वेक्षण केले हाेते. त्यात ही बाब समाेर आली. इतर पारंपरिक आणि डिजिटल मीडिया प्लॅटफाॅर्मच्या तुलनेत बातम्या मिळवण्यासाठीचे सर्वांत विश्वासार्ह माध्यम म्हणजे वर्तमानपत्रच आहे, असा या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. वर्तमानपत्रे ही आपली विश्वासार्हता वेगाने गमावत चालली आहेत आणि डिजिटल न्यूज त्यांची जागा घेतील, असा समजदेखील या सर्वेक्षणाने दूर केला आहे.विश्वासार्हतेच्या सूचीमध्ये (न्यूज क्रेडिबिलिटी इंडेक्स) वर्तमानपत्रांनी 62% पहिले स्थान पटकावले आहे, तर त्यापाठाेपाठ रेडिओ आणि टीव्हीला पसंती मिळाली आहे. सध्या साेशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर मिळणाऱ्या सत्य आणि कल्पित गाेष्टींमध्ये फरक करणे दिवसेंदिवस कठीण हाेत चालले आहे. तसेच, फेक न्यूजमुळे धाेका वाढत चालला असल्याच्या काळातच या सर्वेक्षणातील निष्कर्ष समाेर आले आहेत. ऑरमॅक्स मीडियाचा हा न्यूज क्रेडिबिलिटी इंडेक्स नावाचा सर्व्हे 17 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये घेतला गेला. त्यात 15 वर्षांवरील 2,400 नागरिक सहभागी झाले हाेते.डिजिटल आणि साेशल मीडिया ज्या गतीने वाढत आहे त्या तुलनेत त्यांची विश्वासार्हता घसरल्याचे सर्वे क्षणात दिसले आहे. त्यात साेशल मीडियाचा वाटा 32 टक्क्यांवर व्हाॅट्सअ‍ॅपसारख्या मेसेंजर अ‍ॅपचा वाटा 29 टक्के एवढा खाली आला आहे.सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, बातम्यांसाठी डिजिटल अ‍ॅप्समध्ये ट्विटर हे साेशल मीडियावरील सर्वांत विश्वासार्ह माध्यम वाटते आहे. त्यामध्ये ट्विटर हे टीव्हीच्या जवळपास असून, ते 53 टक्के लाेकांना ते विश्वासार्ह वाटते, तर इतर लाेकप्रिय म्हणवणारी माध्यमे बरीच खाली आहेत. त्यामध्ये टेलिग्राम 31%, फेसबुक 30%, इन्स्टाग्राम 29%, तर व्हाॅटस्अ‍ॅपची क्रमवारी 28% एवढीच आहे.या अहवालानुसार सुमारे 61 टक्के लाेकांना फेक न्यूज ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे वाटते. वास्तविक टीव्हीवरील बातम्या या प्रिंट मीडियाच्याच पातळीवर असायला हव्यात. पण, तशा त्या नसणे हीच टीव्हीसाठी सर्वांत माेठी समस्या बनली आहे.