लाॅकडाऊन काळात अनेक घरांमध्ये लागली बाळाच्या आगमनाची चाहूल...

    20-Sep-2020
Total Views |
हाॅस्पिटलच्या ओपीडींमध्ये गर्भवती महिलांच्या प्रमाणात वाढ

chnvjgkuhoi./_1 &nbs 
 
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर (वि.प्र.) : काेराेना महामारीचे अनेक वाईट परिणाम झाले असले, तरी या काळात मिळालेल्या शांतपणाचा, काैटुंबिक आयुष्यावर चांगला प्रभाव पडला असून, अनेक कुटुंबांमध्ये बाळाच्या आगमनाची चाहूल लागली आहे.दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील अनेक नामवंत स्त्रीराेग आणि वंध्यत्व निवारणतज्ज्ञांचे हे निरीक्षण आहे.महामारीचा संसर्ग राेखण्यासाठी लाॅकडाऊनचा उपाय अमलात आल्यामुळे लाेक घरी हाेते. त्याचा सुपरिणाम म्हणजे शांतता, तणाव कमी हाेणे आणि प्रदूषण घटणे. आराेग्याला अपायकारक वातावरणामुळे अनेकांना असलेल्या समस्याही या काळात कमी झाल्या. पती-पत्नी घरातूनच काम करत असल्यामुळे त्यांना भवितव्याचा शांतपणाने विचार करता आला.कामावर जाण्यासाठी करावा लागणारा लांबचा प्रवास, त्यातून येणारा थकवा आणि ताण या काळात कमी झाले. काम आणि व्यक्तिगत आयुष्यात संतुलन साधण्यासाठी करावी लागणारी कसरतही थांबल्यामुळे दाम्पत्यांना एकमेकांसाठी वेळ काढणे श्नय झाले आणि त्याचा परिणाम म्हणजे अनेक घरांमध्ये लवकरच बाळांचे आगमन हाेणार असल्याचे या तज्ज्ञांनी सांगितले.गेल्या काही महिन्यांत बाह्य रुग्ण विभागात गर्भवती महिलांचे प्रमाण वाढल्याची माहिती नवी दिल्लीतील ‘उजाला सिग्नस हेल्थकेअर सर्व्हिसेस’मधील वरिष्ठ स्त्रीराेग आणि प्रसूतितज्ज्ञ डाॅ. अ्नता बजाज यांनी दिली. राेजच्या धावपळीमुळे तणाव येऊन गर्भधारणा हाेत नसलेल्या अनेक महिलांचा आता गर्भधारणा झालेल्यांत समावेश आहे. लाॅकडाऊनमुळे घरी राहावे लागले आणि त्यातून निवांतपणा मिळाल्यामुळे अनेक दाम्पत्यांनी घरात नवा सदस्य आणण्याचा निर्णय केला, त्यातून महिलांमधील गराेदरपणाचे प्रमाण वाढले, असे त्या म्हणाल्या.माझ्याकडे तपासणीसाठी येणाऱ्या अनेक महिला सध्या तीन ते चार महिन्यांच्या गर्भवती असल्याचे डाॅ. बजाज यांनी नमूद केले.
काेराेनापूर्व काळात महिलांमध्ये गर्भधारणा का हाेत नव्हती याचे कारण सांगताना गुरूग्राममधील ‘पारस हाॅस्पिटल्स’च्या स्त्रीराेग आणि प्रसूतितज्ज्ञ डाॅ. मनप्रीत साेधी म्हणतात, ‘काेराेना महामारीपूर्वी बहुसंख्य दाम्पत्यांना काम आणि व्यक्तिगत आयुष्याचा समन्वय साधणे श्नय हाेत नव्हते. आजच्या काळात गर्भवती हाेण्यासाठीसुद्धा नियाेजन करावे लागते आणि त्यासाठी पुरेशा वेळेबराेबरच शांततेची गरज असते. कामाच्या दबावामुळे बहुतेक जाेडप्यांना बाळाचा विचार करणेसुद्धा श्नय नव्हते. आता मात्र बहुतेक लाेक घरून काम करत असल्यामुळे त्यांना काम आणि व्य्नितगत आयुष्याचा मेळ घालणे श्नय झाले आहे. बाळ हवे असेल, तर त्यासाठी ही याेग्य वेळ आहे. कामाच्या दबावामुळे एवढे दिवस ते श्नय झाले नसल्यास, आता विचार करावा.’ सध्या घरी असल्यामुळे दाम्पत्यांना एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेता येईल. एकमेकांना असे समजून घेणे हे भावी आई-बाबांसाठी चांगले असते, असा सल्ला पालम विहारमधील ‘काेलम्बिया एशिया हाॅस्पिटल’च्या प्रसूती विभागाच्या प्रमुख डाॅ. अमिता शहा यांनी दिला.