हिमवृष्टीतही पिकतात लडाखमध्ये भाज्या

19 Sep 2020 11:59:25
लडाखमध्ये लवकरच हिमवृष्टीला सुरुवात हाेईल. हिमवृष्टी सुरू झाली की लडाखला देशाशी जाेडणारे सर्व रस्ते बंद हाेतात, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे त्याचा माेठा परिणाम भाज्या व फळांच्या पुरवठ्यावर हाेताे. लडाखमध्ये 1962 पूर्वी फक्त 4 भाज्या लावल्या जात हाेत्या. आता येथील शेतकरी 25 भाज्या घेत आहेत.सध्या प्रयाेगशाळेत 78 भाज्यांवर संशाेधन सुरू आहे. हिमवृष्टी हाेत असताना पिक घेणे, हे लडाखवासीयांसाठी आव्हान असते.

xftrhctyh_1  H  
 
 
डीआरडीओची मदत
 
देशाचा आणि लडाखचा संपर्क तुटला की तेथील जनजीवन विस्कळीत हाेते. कारण जीवनावश्यक वस्तूंचा अभाव निर्माण हाेताे.
त्यामुळे लडाख फळे व भाजीपाल्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणे आवश्यक आहे.मात्र, बर्फवृष्टी हाेत असताना भाज्या पिकवणे अत्यंत जिकिरीचे असते. या पार्श्वभूमीवर लेहमध्ये संरक्षण संशाेधन व विकास संस्थेकडून (डीआरडीओ) शेतकऱ्यांना खास प्रशिक्षण दिले आहे. लडाखमध्ये तापमान उणे 30 हून उणे 40 डिग्री सेल्सियसपर्यंत कमी हाेते.अशा तापमानात भाज्या घेणे अशक्य असते.
या तापमानातही सैनिकांना ताज्या भाज्या मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.बंकरचा वापर आणि भूमिगत साठवणूक लेहपासून 12 किलाेमीटरवर असलेल्या गावातील ग्रामस्थांनी गेल्या महिन्यात 50 टन टरबूज काढण्याचा विक्रम केला आहे. हे तंत्रज्ञान त्यांनी डीआरडीओकडून मिळाले आहे. 2016 मध्ये या गावातील 10 शेतकऱ्यांनी चाचणी घेतली हाेती. सध्या ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ हाय अ‍ॅल्टिट्यूड रिसर्च’कडून लष्करासाठी बंकरचा वापर भाज्यांसाठी कसा करावा, या तंत्रावर काम केले जात आहे. एवढेच नव्हे, तर सीमेलगतच्या भागात भाज्या साठवून ठेवण्यासाठी खास भूमिगत साठवणुकीसाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे. येथे थंडीच्या काळात तीन ते चार महिन्यांपर्यंत भाज्या साठवल्या जाऊ शकतात. या स्टाेरेजमध्ये सहा महिन्यांपर्यंत बटाटे साठवण करता येतात. या बंकरची क्षमता 20 ते 100 टनांपर्यंत असू शकते.
 
फळांचा पुरवठा असाही
 
लडाखमध्ये लष्कराची 50 टक्के ताज्या अन्नाची गरज पूर्ण करण्यात प्रयाेगशाळेला यश आले आहे. दर वर्षी ही प्रयाेगशाळा भाज्यांची 25 लाख राेपांचे लडाखमध्ये वाटप करते.गेल्या तीन वर्षांपासून सीमेलगत लष्कराच्या युनिट्समध्ये 200 ट्रेंच ग्रीनहाऊस अथवा अंडरग्राउंड व्हेजिटेबल बेड्स तयार करण्यात आले आहेत. याच तंत्राने शेतकऱ्यांनी लष्करास गेल्या वर्षी 3.5 मेट्रिक टन फळांचा पुरवठा केला हाेता.
 
Powered By Sangraha 9.0