मथुरेतील कृष्णकाळातील वैशिष्ट्यपूर्ण दीर्घ विष्णू मंदिर

    19-Sep-2020
Total Views |
 
xdhtthj_1  H x
 
अधिक महिन्याला पुरुषाेत्तम मास असेही म्हणतात. या महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेला महत्त्व दिलं जातं. मथुरेत श्रीकृष्णाची अनेक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचं काही ना काही वैशिष्ट्य आहे.श्रीकृष्ण हा विष्णूचाच अवतार आहे.त्यामुळे मथुरा श्रीकृष्णाची जन्मभूमी असली, तरी इथे त्याच्या मूळ रूपाची अर्थात विष्णूचीही भक्तिभावाने पूजा केली जाते. इथलं विष्णू मंदिर दीर्घ विष्णू मंदिर म्हणून ओळखलं जातं.हे मंदिर प्राचीन असल्याचं मानलं जातं.काहींच्या मते हे मंदिर कृष्णकाळातही अस्तित्वात हाेतं असं मानल जातं. या मंदिरात आहे तशी विष्णूची मूर्ती भारतात कुठेही बघायला मिळत नाही. याठिकाणी विष्णुदर्शनासाठी भाविक गर्दी करतात.
दीर्घ विष्णू मंदिरात श्रद्धेने आणि भक्तिभावाने आलेल्या प्रत्येक मनुष्याच्या संकटांचा नाश श्रीहरी स्वत: करतात.अशी भविकांची श्रद्धा आहे. वराह पुराण, नारद पुराण तसंच भगवद्गीतेतही दीर्घ विष्णू मंदिराचा उल्लेख आढळताे.विष्णूला मथुरा अत्यंत प्रिय आहे.
मथुरेसारखं काेणतंही स्थान पूर्ण ब्रह्मांडात नाही, असं विष्णू म्हणत असल्याचं वराह पुराणात नमूद करण्यात आलं आहे. या मंदिरात असणारी विष्णूची मूर्ती श्रीकृष्णाने कंसवधाच्या वेळी घेतलेल्या विराट स्वरूपाचं दर्शन घडवते.