राजस्थानी मांड गायिका मांगीबाई

    19-Sep-2020
Total Views |

xfthxyj_1  H x  
 
ज्याप्रमाणे पडराेनी गायिका तिजनबाई त्यांच्या ठसकेबाज गायन शैलीमुळे जगभर ओळखल्या जातात, त्याचप्रमाणे मांड लाेकगीत गायिका मांगीबाई राजस्थानी सर्वांत लाेकप्रिय लाेकगीत गायिका आहेत. त्यांचे ‘केसरिया बालम आओनी पधाराे म्हाराे देश’ हे अतिशय लाेकप्रिय मांड गीत आहे.सुमारे 57 वर्षांपूर्वी मांगीबाईचा मेवाडमध्ये जन्म झाला. मांगीबाईर्ंचे वडील कमलराम प्रतापगढ स्टेटचे राजकवि हाेते व आई देखील श्रेष्ठ गायिका हाेत्या. मांगीबाईंचा वयाच्या 14 व्या वर्षीय वडाेदा येथील प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद फैयाज खां यांचे शिष्य रामनारायण यांच्याशी विवाह झाला.बालपणात आईवडिलांकडून आणि विवाह झाल्यावर सासरी शास्त्रीय संगीत तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे त्या लाेकप्रिय लाेकगायिका बनल्या. त्यांना हजाराे मांड लाेकगीते ताेंडपाठ आहेत. त्यांची खास माैलिक गायनशैली, खटके, मुरके यामुळे त्यांची मांड लाेकगायिका म्हणून भरपूर प्रसिद्धी मिळविली असून त्या प्रख्यात मांड गायिका पद्मश्री अल्लाह जिलाई बाई आणि गाैरी देवीच्या बंदिशींचा माेठ्या खुबीने वापर करतात. त्या आता मांड लाेकगीतांचा पर्याय मानल्या जातात, प्रख्यात गझल गायक मेहंदी हसन, लाेकगायिका रेश्मा, प्रख्यात कव्वाली गायक फरिद मकबूल, मांड गायिका अल्लाह जिलाईबाई यांना गाैरी देवी प्रेरणास्राेत मानतात.