पृथ्वीपेक्षा पाच पट नवा ग्रह

    19-Sep-2020
Total Views |
लघुग्रहांच्या पलीकडे अवकाशातील अंधारात माेठा ग्रह अस्तित्वात आहे का? कदाचित ताे नववा ग्रह असू शकताे, असा शस्त्रज्ञांचा अंदाज आहे.

sthdryh_1  H x  
 
आपली सूर्यमाला चित्रविचित्र गाेष्टींनी भरलेली आहे.सूर्यमालेबद्दलचे संशाेधन जसजसे हाेत आहे, तसतसे त्यांची माहिती आपल्याला हाेत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपली सूर्यमाला अधिक चांगल्या पद्धतीने कळण्यास सुरुवात झाली आहे. कुईपर बेल्टमध्ये असलेल्या अनेक लघुग्रहांची माहिती नव्याने हाेत आहे.गाॅबलिन नावाचा नवा बटू ग्रहही आपल्याला सूर्यमालेच्या टाेकाला आढळून आला आहे.फारआऊट नावाचा आणखी एक लघुग्रह दाेन वर्षांपूर्वीच आढळला आहे. नव्याने सापडलेले हे सर्व लघुग्रह आकाराने अत्यंत छाेटे आहेत. या लघुग्रहांच्या पलीकडे अवकाशातील अंधारात माेठा ग्रह अस्तित्वात आहे का? कदाचित ताे नववा ग्रह असू शकताे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. या ग्रहाचे वस्तुमान पाच ते दहा पृथ्वींएवढे असू शकते, असे शास्त्रज्ञांना वाटते.
पण कदाचित हा नववा ग्रह नसेलही कदाचित. काही शास्त्रज्ञांच्या मते ते एक छाेटे कृष्णविवर असावे. हारवर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे अंदाज वर्तविले आहेत.कृष्णविवराकडे सर्व वस्तू खेचल्या जातात, प्रकाशही तेथून परावर्तीत हाेत नाही. ज्या भागात कृष्णविवर असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे, त्या भागाची निरीक्षणे केल्यानंतर त्याबाबत काही सांगता येऊ शकेल.
व्हेरा सी. रुबीन प्रयाेगशाळा पुढील काही महिने आठव्या ग्रहापलीकडील भागाची छायाचित्रे घेणार आहे.लिगसी सर्व्हे ऑफ स्पेस अँड टाईम असे या प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पाद्वारे पुढील दहा वर्षांत विविध खगाेलीय घटकांची निरीक्षणे नाेंदविली जाणार आहेत. सुमारे 40 हजार नवे खगाेलीय घटक या प्रकल्पाद्वारे शाेधले जातील. त्यातून सूर्यमालेच्या शेवटी नववा ग्रह आहे की कृष्णविवर हे स्पष्ट हाेऊ शकणार आहे. लिगसी सर्व्हे ऑफ स्पेस अँड टाईम या प्रकल्पाद्वारे प्रामाेर्डिअल ब्लॅक हाेल शाेधण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. कदाचित आपल्याच सूर्यमालेत त्यांचे अस्तित्व दिसून येऊ शकेल. व्हेरा रुबीन प्रयाेगशाळेची बांधणी सध्या चिलीमध्ये सुरू आहे. या वर्षअखेरीस ती कार्यान्वित हाेण्याची शक्यता आहे. त्यानंतर 2023पर्यंत लिगसी सर्व्हे ऑफ स्पेस अँड टाईम प्रकल्पाद्वारे निरीक्षणे घेतली जाणार आहेत.