मनपा कंत्राटी वाहनचालकांचे वेतन रखडले

19 Sep 2020 11:37:31

Zsgxth_1  H x W
 
पुणे, 18 सप्टेंबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क पुणे) : काेराेनाच्या साथीतही महापालिकेच्या रथांचे सारथ्य करणाऱ्या सुमारे 740 कंत्राटी वाहनचालकांना एक महिन्याचे वेतन मिळालेले नाही. वाहनचालकांची भरती करण्यासाठीच्या निविदा काढण्यापासून त्या रद्द करून पुन्हा फेरनिविदा काढण्याच्या गाेंधळात कंत्राटी वाहनचालकांचे वेतन रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली.लवकरच निविदाप्रक्रिया पूर्ण हाेईल व पुढील आठवडाभरात वाहनचालकांना वेतन मिळेल, असे स्पष्टीकरण व्हेईकल डेपाेचे प्रमुख नितीन उदास यांनी दिले.महापालिकेच्या अगदी कचरा उचलण्याच्या वाहनांपासून अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनांपर्यंत बहुतांश ठिकाणी महापालिकेने कंत्राटी चालकांची नियुक्ती केली आहे. काेराेनामुळे करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे आर्थिक गणित काेलमडले असतानाही प्रशासनाकडून कंत्राटी वाहनचालकांच्या नियुक्तीसाठी पाच वर्षांची निविदा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.पुरेशी स्पर्धा झाल्यानंतरही निविदाप्रक्रिया रद्द करण्यात आल्याने, तसेच निविदा किती वर्षांसाठी काढायची, या गाेंधळामागे माेठे आर्थिक कारण आहे. मात्र, यामुळे ऐन काेराेना काळात अहाेरात्र सेवा बजावणाऱ्या सुमारे 740 कंत्राटी वाहनचालकांचे वेतन अडकले आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना व्हेईकल डेपाेचे उपायुक्त नितीन उदास म्हणाले की, कंत्राटी वाहनचालक नेमण्याची निविदा काढण्यात आली आहे. लवकरच या निविदेला मंजुरी देण्यात येईल.
Powered By Sangraha 9.0