लायन्स क्लब एसटी कर्मचाऱ्यांची काळजी घेईल : अभय शास्त्री

19 Sep 2020 11:33:33
स्वारगेट डेपाेमध्ये एसटी कर्मचारी, प्रवाशांना मास्क वाटप

xgnfcghj_1  H x 
 
पुणे, 18 सप्टेंबर (आ.प्र.) ः सीमेवर सैन्य ज्या धैर्याने कामगिरी बजावते, त्याच धैर्याने प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे.सेवाभावी उपक्रमांतून लायन्स क्लब एसटी कर्मचाऱ्यांकरिता कार्यरत राहील, असे आश्वासन लायन्स क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री यांनी केले.स्वारगेट एसटी स्टँड येथे काल गुरुवारी (17 सप्टेंबर) झालेल्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते.स्वारगेट एसटी डेपाेचे कर्मचारी,प्रवाशांना काेव्हिडपासून सुरक्षिततेसाठी मास्कचे वाटप करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ इकाे फ्रेंडस, लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रिम यांनी हा कार्यक्रम आयाेजिला हाेता.प्रांतपाल अभय शास्त्री, पुनीत काेठारी, अनिल मंद्रुपकर, सुहास कुलकर्णी, राेहिणी नागवणकर यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. यावेळी सुनीता चिटणीस, प्रीती दीक्षित, महादप्पा अणदुरे, प्रमाेद उमरदंड, तसेच स्वारगेट एसटी डेपाेचे अधिकारी उपस्थित हाेते. अनिल मंद्रुपकर यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले.
 
Powered By Sangraha 9.0