महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी सांगितलेले राेजच्या प्रार्थनेचे महत्त्व

19 Sep 2020 12:05:41
प्रार्थनेतून निर्माण हाेणारी ऊर्जा यातून त्या काळी सगळ्यांना देशाला इंग्रजांच्या जाेखडातून मुक्त करण्यासाठी प्रेरणा मिळाली. आपण स्वतंत्र झालाे पाहिजे, या एकाच ध्यासाने झटण्यासाठी बळ मिळालं.

sxrthdtxyj_1  H 
महात्मा गांधींनी प्रार्थनेचे महत्त्व सांगितलेले आहे. त्यांच्या सभा प्रार्थनेने सुरू व्हायच्या. त्यांच्या आश्रमात नियमितपणे सकाळच्यावेळी आणि संध्याकाळच्या वेळी प्रार्थना हाेत असे. आजही त्यांच्या आश्रमात प्रार्थना हाेतेप्रार्थनेतून निर्माण हाेणारी ऊर्जा यातून त्याकाळी सगळ्यांना देशाला इंग्रजांच्या जाेखडातून मुक्त करण्यासाठी प्रेरणा मिळाली.आपण स्वतंत्र झालाे पाहिजे, या एकाच ध्यासाने झटण्यासाठी बळ मिळालं. त्यात या दरराेजच्या प्रार्थनेचा परिपाठ निश्चितच महत्त्वाचा हाेता.‘प्रार्थना’ म्हणजे आत्मशाेधाचा, आत्मचिंतनाच एक मार्ग आहे, असे गांधीजी म्हणत असत. प्रार्थनेची आणि आपली पहिली ओळख हाेती ती शाळेत.सगळ्यांनी एकासुरात, एक आवाजात शाळेच्या पटांगणात केलेली प्रार्थना. दरवर्षी नवीन नवीन प्रार्थना...प्रार्थनेमुळे एक प्रकारची ऊर्जा तयार हाेते. सगळ्यांची प्रार्थना नीट ताेंडपाठ व्हावी म्हणून वर्गशिक्षक प्रयत्न करतात आणि काही दिवसांतच आपाेआप शाळेतल्या चपराशी काकांपासून ते शाळेजवळ राहणाऱ्या घरातील मंडळींनासुद्धा ती प्रार्थना पाठ हाेऊन जाते. सध्या तुम्ही घरी असल्याने आणि शाळेत जाता येत नसल्याने प्रार्थना नक्कीच मिस करत असणार.
 
Powered By Sangraha 9.0