विद्या बालनची 63 हजार रुपयांची साडी

    19-Sep-2020
Total Views |
 
zdthrydh_1  H x
 
अभिनेत्री विद्या बालनचे साडीप्रेम सर्वश्रुत आहे. केवळ साडीच नव्हे, तर पारंपरिक दागिन्यांचीही तिला आवड आहे. ती जेव्हा जेव्हा साडी नेसते, तेव्हा तेव्हा तिच्या स्टाइलवर, दागिन्यांच्या निवडीवर चर्चा हाेत असते.मंगलकरी सिल्क, फुलांची एम्ब्राॅयडरी असलेली, कांजीवरम ते पत्तू अशा विविध प्रकारच्या साड्या नेसून ती अत्यंत नजाकतीने वावरत असते.नुकतीच तिने एक 63 हजारांपेक्षाही अधिक किमतीची साडी नेसून चाहत्यांना सुखद धक्का दिला हाेता.अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर पाेस्ट केलेल्या एका फाेटाेत ती एका अत्यंत सुंदर साडीत दिसत आहे. ही साडी बहुरंगी ऑर्गन्झा आहे. विशेष म्हणजे ती हाताने पेंट केलेली कलमकारी पद्धतीची साडी आहे. त्यामध्ये जर्दाेझी आणि डाबकाचा वापर केला आहे. या साडीबराेबर तिने साेनेरी मेटॅलिक हाताने विणलेला लॅम्पी ब्लाऊझ घातला आहे. ही साडी ‘इत्र’ या प्रसिद्ध ब्रँडची असून, तिची किंमत आहे 63 हजार 749 रुपये, तर खरी किंमत आहे 74 हजार 999 रुपये.ही महागडी साडी नेसलेल्या विद्याच्या डाेळ्यांना स्माेकी मेकअप असून तिने ओठांवर न्यूड लिपस्टिक लावली आहे. माेठे इयररिंग्ज घातले असून, केसांचा मध्यभागी भांग पाडला आहे. यापूर्वीही विद्या बालनने फुलांची साडी नेसून फाेटाे पाेस्ट केला हाेता. ऑगस्ट महिन्यात तिने संबलपुरी साडी नेसली हाेती. ही साडी फॅशनप्रेमींसाठी चर्चेचा विषय बनली हाेती. त्या पारंपरिक साडीची किनार लाल हाेती. ही साडी विणण्यासाठी एक महिना लागला हाेता आणि रमाकांत मेहर यांनी ती विणली हाेती. ‘शकुंतला देवी’ची प्रसिद्धी करताना तिने ती नेसली हाेती. नंतर या साडीचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला आणि एका 20 वर्षांच्या मुलीने ती 55 हजार रुपयांना विकत घेतली हाेती.