नवी मुंबईत आराेग्य सर्वेक्षणासाठी 720 पथक

18 Sep 2020 11:01:14
 
bfxhbgn_1  H x
 
नवी मुंबई, 17 सप्टेंबर (आ.प्र.) : नवी मुंबई महापालिकेने शहरात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान राबवण्यासाठी 720 पथके स्थापन केली आहेत. प्रत्येक पथक राेज किमान 50 घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करणार असून, दहा दिवसांत 5 लाखांपेक्षा जास्त घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. काेराेनामुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात आहे.नवी मुंबईत अभियान यशस्वी करण्यासाठी आयु्नत अभिजित बांगर यांनी जास्तीत जास्त पथके तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक पथकात दाेन ते तीन कर्मचारी व स्वयंसेवकांचा समावेश असणार आहे. हे पथक घराेघरी जाऊन प्रत्येकाचे ऑक्सिजन सॅच्युरेशन व तापमान माेजले जाणार आहे. एखाद्या व्यक्तीला ताप, खाेकला, घशात खवखवणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास हाेत आहे का, हे तपासले जाणार आहे. मधुमेह, हृदयराेग, कर्कराेग, मूत्रपिंडाचे आजार, अवयव प्रत्याराेपण, दम अशा सहव्याधी असणाऱ्या नागरिकांची माहिती संकलित केली जाणार आहे. नवी मुंबईत 10 ऑक्टाेबरपर्यंत पहिला टप्पा व 14 ते 24 ऑक्टाेबरदरम्यान दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. या अभियानास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. साेसायटीतील मुले, ज्येष्ठ नागरिक विनाकारण घराबाहेर जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.साेसायटीत दाेन व्य्नतींमध्ये किमान सहा फूट अंतर राखून संवाद साधावा. बाहेरील व्य्नतीला थेट प्रवेश देऊ नये. बाहेरून येणाऱ्या व्य्नतीचे तापमान, ऑक्सिजन तपासणी करूनच प्रवेश द्यावा. दुकाने, मंडई, माॅलमध्ये खरेदीसाठी जाताना घरातील एकाच व्य्नतीने जावे. खरेदीसाठी गेल्यानंतर तेथे प्रदर्शनार्थ ठेवलेल्या वस्तूंना शक्यताे स्पर्श करणे टाळावे, अशा सूचनाही पालिकेने केल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0