महावितरणच्या कल्याण परिमंडलातील 52 अभियंत्यांचे रक्तदान

    18-Sep-2020
Total Views |
 
zdxbcfhncg_1  H
 
कल्याण, 17 सप्टेंबर (आ.प्र.) : महावितरणच्या कल्याण परिमंडल कार्यालयात अभियंता दिनानिमित्त आयाेजित र्नतदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सबाॅर्डिनेट इंजिनियर्स असाेसिएशनने घेतलेल्या या शिबिरात 52 अभियंत्यांनी र्नतदान केले. तसेच, काेराेनावर मात केलेल्या सहा अभियंत्यांनी प्लाझ्मा दानाच्या आवश्यक चाचणीसाठी नमुने दिले.मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या हस्ते भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून र्नतदान शिबिराला प्रारंभ झाला. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून संघटनेने आयाेजिलेल्या या उपक्रमाचे काैतुक करत अग्रवाल यांनी स्वतः या शिबिरात र्नतदान केले. संघटनेचे पदाधिकारी श्रीनिवास बाेबडे, रवींद्र नाहीदे यांच्यासह 52 जणांनी या शिबिरात भाग घेत र्नतदान केले. काेराेनाचा यशस्वीपणे सामना केलेल्या सहा अभियंत्यांनी प्लाझ्मा दानाची तयारी दर्शवत त्यासाठी आवश्यक नमुने चाचणीसाठी दिले. यावेळी अधीक्षक अभियंता सुनील काकडे, प्रवीण परदेशी आदींसह परिमंडलातील अभियंते उपस्थित हाेते.